खानापूर
उद्या फक्त या शाळांना सुट्टी
बेळगाव : मुसळधार पाऊस आणि कृष्णा आणि घटप्रभा नद्यांना आलेल्या पुराच्या पार्श्वभूमीवर बेळगाव जिल्ह्यातील गोकाक आणि मुडलगी तालुक्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
उपायुक्त मोहम्मद रोशन यांनी निपाणी, कागवाड, हुक्केरी, चिक्कोडी तालुक्यातील पूरग्रस्त गावे आणि ज्या शाळांमध्ये केअर सेंटर सुरू करण्यात आले आहेत, त्यांनाच सुट्टी जाहीर करण्याचे आदेश काढले आहेत.
जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये पावसाचा कहर ओसरला असून शाळा नेहमीप्रमाणे सुरू होत आहेत.
खानापूर तालुक्यातील शाळा गेल्या दहा दिवसांपासून बंद होत्या. त्या उद्यापासून सुरू होणार आहेत.