खानापूर

खानापूरचे उद्योजक सॅविओ परेरा यांचे शेतकऱ्यांसाठी स्मार्ट पाऊल – ‘SBOF ॲग्रोस्मार्ट’ अँपचे लाँचिंग

बेळगाव: भारतातील शेतीला आधुनिक आणि डिजिटल तंत्रज्ञानाशी जोडण्यासाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा नुकताच गाठण्यात आला. खानापूरचे उद्योजक सॅविओ परेरा आणि सौ. स्वाती परेरा यांनी स्थापन केलेल्या SBOF ॲग्रोस्मार्ट प्रा. लि. या ॲग्रीटेक स्टार्टअपने ‘SBOF ॲग्रोस्मार्ट’ हे देशातील पहिले AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) आधारित ऑल-इन-वन ॲग्री अँप बेळगाव येथे काल रविवार 20 एप्रिल रोजी लाँच केले.

रविवारी सायंकाळी बेळगावमधील हॉटेल ईफहा येथे झालेल्या या कार्यक्रमात विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती होती. प्रमुख पाहुणे म्हणून बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी, बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ (राजू) शेठ, बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष अप्पासाहेब कुलगोडे, माजी ऊर्जामंत्री वीरकुमार पाटील, शाम घाटगे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

या ॲपचा उद्देश भारतभरातील शेतकऱ्यांना हवामानातील बदल, कीड व रोगांचा प्रादुर्भाव, बाजारातील अस्थिरता, अपुरी माहिती, निकृष्ट निविष्ठा व सरकारी योजनांपर्यंत पोहोचण्यात येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी आधुनिक डिजिटल साधन पुरवणे हा आहे.

‘SBOF ॲग्रोस्मार्ट’ अँपमध्ये मिळणाऱ्या सुविधा:

  • AI आधारित हवामानानुसार पीक सल्ला
  • पिकांसाठी पोषण व संरक्षण यांचे वेळापत्रक
  • 24*7 चॅटबॉटद्वारे त्वरित मार्गदर्शन
  • ड्रोनद्वारे फवारणी आणि अचूक शेती सेवा
  • मृदा चाचणी आणि पाण्याच्या गुणवत्तेची चाचणी
  • ताज्या कृषी व सरकारी योजना बातम्या
  • सर्व शेतकऱ्यांसाठी योग्य निविष्ठा खरेदीसाठी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म

कार्यक्रमात बोलताना सॅविओ आणि स्वाती परेरा यांनी सांगितले,

“आजच्या काळात शेतकऱ्यांना वेळेवर आणि विश्वासु माहिती मिळणे अत्यंत गरजेचे आहे. हे अँप त्यांना तांत्रिकदृष्ट्या सक्षम बनवते, चांगल्या शेतीसाठी योग्य निर्णय घेण्यास मदत करते आणि नुकसान कमी करत उत्पादनक्षमतेत वाढ करते. हे अँप म्हणजे केवळ एक तंत्रज्ञान नव्हे, तर स्मार्ट शेतीकडे जाणारी एक चळवळ आहे.”

या स्टार्टअपच्या मागे खतनिर्मिती व कृषी निविष्ठांमध्ये दशकभराचा अनुभव असून आता त्यांनी AI, IoT (Internet of Things) आणि तज्ज्ञ मार्गदर्शकांचे नेटवर्क यांच्यासह भविष्याच्या शेतीसाठी एक डिजिटल प्लॅटफॉर्म तयार केला आहे.

हे अँप शेतकऱ्यांसाठी त्यांचा डिजिटल साथीदार ठरणार आहे आणि शेतीचे भविष्य अधिक स्मार्ट, शाश्वत आणि नफादायक बनवण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे.

https://www.instagram.com/reel/DIkyUaZSvLy/?igsh=MTQ3bTBuaDc3amp4YQ==

खानापूर

खानापूरचे उद्योजक सॅविओ परेरा यांचे शेतकऱ्यांसाठी स्मार्ट पाऊल – ‘SBOF ॲग्रोस्मार्ट’ अँपचे लाँचिंग

बेळगांव: भारतातील शेतीला आधुनिक आणि डिजिटल तंत्रज्ञानाशी जोडण्यासाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा नुकताच गाठण्यात आला आहे. खानापूरचे उद्योजक सॅविओ परेरा आणि सौ. स्वाती परेरा यांनी स्थापन केलेल्या SBOF ॲग्रोस्मार्ट प्रा. लि. या ॲग्रीटेक स्टार्टअपने ‘SBOF ॲग्रोस्मार्ट’ हे देशातील पहिले AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) आधारित ऑल-इन-वन ॲग्री अँप बेळगाव येथे साजऱ्या कार्यक्रमात लाँच केले.

रविवारी सायंकाळी बेळगावमधील हॉटेल ईफहा येथे झालेल्या या कार्यक्रमात विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती होती. प्रमुख पाहुणे म्हणून बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी, बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ (राजू) शेठ, बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष अप्पासाहेब कुलगोडे, माजी ऊर्जामंत्री वीरकुमार पाटील, शाम घाटगे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

या ॲपचा उद्देश भारतभरातील शेतकऱ्यांना हवामानातील बदल, कीड व रोगांचा प्रादुर्भाव, बाजारातील अस्थिरता, अपुरी माहिती, निकृष्ट निविष्ठा व सरकारी योजनांपर्यंत पोहोचण्यात येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी आधुनिक डिजिटल साधन पुरवणे हा आहे.

‘SBOF ॲग्रोस्मार्ट’ अँपमध्ये मिळणाऱ्या सुविधा:

  • AI आधारित हवामानानुसार पीक सल्ला
  • पिकांसाठी पोषण व संरक्षण यांचे वेळापत्रक
  • 24*7 चॅटबॉटद्वारे त्वरित मार्गदर्शन
  • ड्रोनद्वारे फवारणी आणि अचूक शेती सेवा
  • मृदा चाचणी आणि पाण्याच्या गुणवत्तेची चाचणी
  • ताज्या कृषी व सरकारी योजना बातम्या
  • सर्व शेतकऱ्यांसाठी योग्य निविष्ठा खरेदीसाठी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म

कार्यक्रमात बोलताना सॅविओ आणि स्वाती परेरा यांनी सांगितले,

“आजच्या काळात शेतकऱ्यांना वेळेवर आणि विश्वासार्ह माहिती मिळणे अत्यंत गरजेचे आहे. हे अँप त्यांना तांत्रिकदृष्ट्या सक्षम बनवते, शाश्वत शेतीसाठी योग्य निर्णय घेण्यास मदत करते आणि नुकसान कमी करत उत्पादनक्षमतेत वाढ करते. हे अँप म्हणजे केवळ एक तंत्रज्ञान नव्हे, तर स्मार्ट शेतीकडे जाणारी एक चळवळ आहे.”

या स्टार्टअपच्या मागे खतनिर्मिती व कृषी निविष्ठांमध्ये दशकभराचा अनुभव असून आता त्यांनी AI, IoT (Internet of Things) आणि तज्ज्ञ मार्गदर्शकांचे नेटवर्क यांच्यासह भविष्याच्या शेतीसाठी एक डिजिटल प्लॅटफॉर्म तयार केला आहे.

हे अँप शेतकऱ्यांसाठी त्यांचा डिजिटल साथीदार ठरणार आहे आणि शेतीचे भविष्य अधिक स्मार्ट, शाश्वत आणि नफादायक बनवण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे.

Back to top button
डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? फसवणूक कशी होते? काय करावे digital arres अल्लू अर्जुन याला का अटक झाली? महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते