बातम्या
शनिवारीही सुट्टी जाहीर
खानापूर: आज दुपारनंतर पुन्हा पावसाने जोरदार बॅटिंग सुरू केल्याने सुरक्षेच्या कारणास्तव शनिवार दिनांक 27 जुलै 2024 रोजी बेळगाव जिल्ह्यातील सर्व शाळांना (रामदुर्ग तालुका वगळता) सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
या संदर्भातील आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी परिपत्रकाद्वारे जाहीर केला असून सर्व शासकीय अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांना हा आदेश लागू असेल.
अंगणवाडी ते बारावीपर्यंतच्या सर्व शाळा कॉलेजला सुट्टी असणार आहे.