खानापूर

सातनाळी येथे सुवर्ण महोत्सव आणि  विद्यार्थी मेळावा, प्रमुख वक्ते श्री. वासुदेव चौगुले यांचे विशेष मार्गदर्शन

खानापूर: तालुक्यातील सरकारी मराठी उच्च प्राथमिक शाळा, सातनाळी येथे सुवर्ण महोत्सव व माझी विद्यार्थी मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस. एस. परब सर यांनी केले. अध्यक्षस्थानी श्री. पुंडलिक दळवी होते, तर स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक डी. एस. खोत यांनी केले.

कार्यक्रमाची सुरुवात नितेश मिराशी, नमिता मिराशी आणि ग्रामस्थ मान्यवरांच्या हस्ते फोटो पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी प्रमुख पाहुणे बी. एम. पाटील सर, सुनील कुंभार उपस्थित होते. प्रमुख वक्ते मा. श्री. वासुदेव चौगुले यांनी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमास सीआरसी प्रमुख लोंढा मोहिशेत (सुनील शेरेकर), गुंजी शिरोली (बी. ए. देसाई), चापगाव (एफ. आय. मुल्ला) यांच्यासह कु. पांडुरंग नाईक, माझी विद्यार्थी संघटना अध्यक्ष आणि अनेक माजी विद्यार्थी उपस्थित होते. आभार प्रदर्शन श्री. रामचंद्र गावकर यांनी मानले.

Back to top button
डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? फसवणूक कशी होते? काय करावे digital arres अल्लू अर्जुन याला का अटक झाली? महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते