खानापूर

खानापूरात रविवारी RSS चे पथ संचलन

खानापूर: तालुका राष्ट्रीय स्वयंसेवक (Khanapur RSS) संघ यांच्यावतीने सालाबादप्रमाणे यंदाही रविवारी दि.१३ रोजी दुपारी ३ वाजता विजयादशमीचे औचित्य साधुन खानापूर शहरात पथसंचलन व सार्वजनिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

खानापूर शहरातील स्वामीविवेकानंद इंग्रजी शाळेच्या पटांगणावर सुरू होणार्या पथसंचालनचा मार्ग खानापूर शहरातील विविध मार्गावरून पथसंचलन होणार आहे.

याचबरोबर सार्वजनिक समारंभ कार्यक्रमात सायंकाळी ५.३० वाजता होणार आहे. कार्यक्रमात प्रमुख पाहूणे म्हणून डॉ.प्रशात कटकोळ मेंदू शस्त्रचिकित्सा तज्ञ,व संस्थापक कैवल्य योग आश्रम जांबोटी, तसेच बेळगाव येथील विभाग व्यवस्था प्रमुख सुरेश मोहित यांचे बौध्दीक विचार होणार आहेत..

तरी खानापूर तालुक्यातील अनेक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यानी आपल्या गणवेशासह पथसंचलनात सहभागी व्हावे. तसेच खानापूर शहरात पथसंचलनाचे गल्लोगल्लीत स्वागत होणार आहे.तरी सार्वजनिक समारंभ व पथसंचालनाचा लाभ घ्यावा. असे आवाहन तालुका कार्यवाह बाबाजी तिप्पणावर यानी केले आहे.

RSS Path Sanchalan Khanapur 2024

Back to top button
error: Content is protected !!
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा! ashadhi ekadashi quotes in marathi: Ashadhi ekadashi 2025: आषाढी एकादशीचे महत्त्व digital fast: डिजिटल उपवास: फायदे आणि तोटे कामाचा ‘6-6-6’ नियम: कमी वेळेत जास्त यश! सोन्याच्या दरात आणखी घसरण! आजचे ताजे भाव जाणून घ्या