महसूल मंत्री कृष्णबयरेगौडा यांनी केली कुसमळी पूलाची पहाणी; गर्लगुंजी येथे नेमदी केंद्र स्थापनेसाठी सकारात्मक प्रतिसाद
खानापूर, दि. ३० जून — कर्नाटक राज्याचे महसूल मंत्री श्री. कृष्णबयरेगौडा आज सायंकाळी ५.३० वाजता खानापूर तालुक्यातील कुसमळी पूलाची पाहणी केली. त्यांच्या समवेत जिल्हाधिकारी (DC) , पोलीस अधीक्षक (SP) तसेच खानापूर तहसीलदार उपस्थित होते.

कुसमळी पुलावर पोहोचताच ब्लॉक काँग्रेसच्या दोन्ही अध्यक्षांनी शाल आणि हार घालून मंत्री महोदयांचे स्वागत केले. काँग्रेस कार्यकर्त्यांनी देखील हार घालून त्यांचे स्वागत केले.
पुलाची पाहणी केल्यानंतर काँग्रेस नेते यशवंत बिरजे यांनी गायरान जमिनीबाबत माहिती देत काही सरकारी जमिनी बळकावल्याची बाब मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून दिली. तसेच कौलापूरवाडा येथील पोल्ट्री संदर्भात भैरू पाटील व ग्रामस्थांनी निवेदन देत संबंधित अधिकाऱ्यांकडून सहकार्य मिळत नसल्याचे सांगितले.

प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या १९/०५/२०२५ च्या आदेशाची प्रत मंत्री महोदयांना सुपूर्द करण्यात आली. त्यानंतर त्यांनी तत्काळ जिल्हाधिकाऱ्यांना लक्ष घालण्याचे निर्देश दिले.
तालुक्यातील जबरदस्तीने बळकावलेल्या गायरान जमिनींबाबतही सविस्तर चर्चा झाली.
याच दरम्यान गर्लगुंजी ग्राम पंचायत सदस्य प्रसाद पाटील यांनी गर्लगुंजी येथे नेमदी केंद्र स्थापनेची मागणी करत महसूल मंत्री श्री. कृष्णबयरेगौडा यांना निवेदन सादर केले. सध्या गर्लगुंजी, इदलहोंड, शिंगिनकोप, खेमेवाडी, गणेबैल, निटूर, प्रभुनगर, माळअंकले, झाडअंकले, बाचोळी, शिवाजीनगर व इतर गावांना सुमारे २५-२७ किमी दूर असलेल्या जांबोटी येथील नेमदी केंद्रावर अवलंबून राहावे लागते. रस्त्यांची खराब अवस्था, बस सुविधेचा अभाव आणि जंगली प्राण्यांचा धोका यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो.
या पार्श्वभूमीवर आज कलाप्पा लोहार, मारुती पांडूचे, सतीश बुरुड, भरतेश तोरोजी, गुड्डू टेकडी, विवेक तडकोड, सुरेश जाधव, देमन्ना बसरीकट्टी आदी सदस्यांनी मंत्री महोदयांना निवेदन दिले. महसूल मंत्री यांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद देत जिल्हाधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या.
गर्लगुंजी येथे नेमदी केंद्र स्थापन झाल्यास गर्लगुंजीसह इदलहोंड, निटूर, हलकरणी, रामगुरवाडी व इतर आसपासच्या पंचायतींतील नागरिकांना मोठा दिलासा मिळेल, असे ग्रामपंचायत सदस्य प्रसाद पाटील यांनी यावेळी सांगितले.

पश्चात महसूल मंत्री श्री. कृष्णबयरेगौडा यांनी काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधून बेळगावकडे प्रस्थान केले.
या भेटीदरम्यान ॲड. घाडी , मानतेश राऊत, महादेव कोळी, सुरेश भाऊ, सावित्री मादार, प्रसाद पाटील, भैरू पाटील, विलास बेळगावकर, दीपक कवठनकर, संतोष हांजी, साईश सुतार, देमन्ना बसरीकट्टी, भरतेश तोरोजी, विवेक तडकोड, तोहीद चादखन्नवर, गुड्डू टेकडी आदी मान्यवर उपस्थित होते.