सेनेतून समाजसेवेकडे! माजी सैनिक अनिल देसाई यांना प्रतिष्ठित सैन्य सन्मान
कर्तव्यदक्ष माजी सैनिक अनिल देसाई यांचा दक्षिण कमानच्या जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफकडून सन्मान
विश्वभारती कला क्रीडा संघटनेला उल्लेखनीय यश – देशसेवेनंतर समाजकार्यातही झळकलेले कार्य
जिद्द, चिकाटी आणि प्रामाणिक मेहनत असेल तर माणूस कोणत्याही परिस्थितीत यशस्वी होतो, हे दाखवून दिले आहे हलशीवाडी येथील माजी सैनिक अनिल देसाई यांनी. प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढत समाजात सकारात्मक परिवर्तन घडवण्याचे त्यांचे कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी ठरले आहे.

हवालदार अनिल देसाई (आर्मी नं. 2791364W) हे भारतीय सेनेतील सेवा पूर्ण करून सेवानिवृत्त झाल्यावर आपल्या मूळ गावी – हलशीवाडी, ता. खानापूर, जि. बेळगाव येथे ‘विश्वभारती कला क्रीडा संघटना’ स्थापन करून अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली. या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि क्रीडा उपक्रम राबवले आहेत.
त्यांनी गावात श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची भव्य मूर्ती उभारण्याचे कार्य पुढाकार घेऊन पूर्ण केले. तसेच, शहीद सैनिकांच्या स्मृतीप्रीत्यर्थ दोन प्रवेशद्वारे बांधून त्यांना अभिवादन करण्याची प्रेरणादायी कामगिरी केली. लहान मुलांमध्ये शिक्षणाबरोबर योग, क्रीडा, कला व देशप्रेम जागवणाऱ्या विविध स्पर्धा त्यांनी दुर्गम भागात आयोजित केल्या आहेत.
जम्मू-काश्मीर येथे झालेल्या इंटरनॅशनल मॅरेथॉन 2023 मध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतले आणि तिसरा, चौथा, पाचवा आणि बारावा क्रमांक मिळवून दिला. सरकारी मातृभाषा शाळांचे जतन व संवर्धन यासाठीही ते सातत्याने कार्यरत आहेत. राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक सलोखा आणि युवकांना सकारात्मक दिशा देण्यासाठी त्यांनी मोठे योगदान दिले आहे.
या उल्लेखनीय कार्याची दखल घेत लेफ्टनंट जनरल, जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ, दक्षिण कमान यांच्या हस्ते शनिवार, दिनांक 19 जुलै 2025 रोजी पारितोषिक, मेडल व प्रशस्तीपत्र देऊन माजी सैनिक अनिल देसाई यांचा भव्य सन्मान करण्यात आला.
त्यांच्या या कार्यामुळे संपूर्ण बेळगाव जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान वाटतो आहे. देशसेवेपासून समाजसेवेपर्यंतचा त्यांचा प्रवास खऱ्या अर्थाने कर्तव्यदक्ष सैनिकाचे उत्तम उदाहरण ठरतो.
ನಿವೃತ್ತ ಸೈನಿಕ ಅನಿಲ್ ದೇಸಾಯಿ ಅವರಿಗೆ ದಕ್ಷಿಣ ಸೇನಾ ಕಮಾನದ ಗೌರವ
ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯ ಹಳಶಿವಾಡಿಯ ನಿವೃತ್ತ ಹವಲ್ದಾರ್ ಅನಿಲ್ ದೇಸಾಯಿ ಅವರು ವಿಶ್ವಭಾರತಿ ಕಲಾ ಕ್ರೀಡಾ ಸಂಸ್ಥೆ ಮೂಲಕ ಸಮಾಜ ಸೇವೆ ನಡೆಸುತ್ತಿದ್ದು, ಮಕ್ಕಳಲ್ಲಿ ಕ್ರೀಡೆ, ಯೋಗ ಹಾಗೂ ದೇಶಪ್ರೇಮ ಬೆಳೆಸುವ ಕಾರ್ಯ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಅವರು ಶಹೀದ್ ಸ್ಮಾರಕ ದ್ವಾರ ನಿರ್ಮಾಣ, ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜ ಪ್ರತಿಮೆ ಸ್ಥಾಪನೆ ಮತ್ತು ಮ್ಯಾರಥಾನ್ನಲ್ಲಿ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ರಾಷ್ಟ್ರಮಟ್ಟದ ಪ್ರಶಸ್ತಿ ತಂದಿದ್ದಾರೆ. ಈ ಸೇವೆಯನ್ನು ಮಾನ್ಯತೆ ನೀಡಿ, ದಕ್ಷಿಣ ಸೇನಾ ಕಮಾನದ GOC-in-C ಅವರು ಅವರನ್ನು 2025ರ ಆಗಸ್ಟ್ 19ರಂದು ಪದಕ ಹಾಗೂ ಪ್ರಶಂಸಾಪತ್ರದೊಂದಿಗೆ ಗೌರವಿಸಿದ್ದಾರೆ.
Retired Soldier Anil Desai Honored by Southern Army Command
Retired Havaldar Anil Desai from Halshiwadi, Belagavi, has been actively serving society through the Vishwabharati Arts & Sports Organization. He has promoted education, sports, and patriotism among children and led initiatives like installing a statue of Shivaji Maharaj and building martyr memorial gates. His students also achieved top ranks in the 2023 International Marathon. In recognition, the GOC-in-C, Southern Command honored him with a medal and certificate on August 19, 2025.