खानापूर

नंदगड श्री महालक्ष्मी यात्रेची तारीख ठरली, आज रेडा सोडण्याचा कार्यक्रम संपन्न

खानापूर: तालुक्यातील नंदगड गावची ग्रामदेवता श्री महालक्ष्मी देवीचा यात्रोत्सव पुढील वर्षी दि. 12 फेब्रुवारी 2025 रोजी करण्याचे ठरविण्यात आले आहे. तब्बल 24 वर्षानंतर प्रथमच नंदगड गावची ग्रामदेवता यात्रा होणार असून गावामध्ये आनंदाचे वातावरण आहे. यात्रेचा पहिला धार्मिक कार्यक्रम आज मंगळवारी मोठ्या भक्तीभावाने उत्साहात पार पडला. रेडा सोडण्याच्या धार्मिक कार्यक्रमात समस्त नंदगडवासीय सहभागी झाले होते.

यावेळी देव देवतांना गाऱ्हाणे घालून देवीला रेडा सोडण्यात आला. सदर वाद्यांच्या गजरात पार पडलेल्या धार्मिक विधीमध्ये गावातील सुहासिनी महिला डोक्यावर मंगल कलश घेऊन सहभागी झाल्या होत्या.

या पद्धतीने 6 महिने आधी यात्रोत्सवपूर्व कार्यक्रमांना आज मोठ्या भक्तीभावाने उत्साही वातावरणात प्रारंभ करण्यात आला. आता येत्या दोन दिवसात देवीचा रेडा मानकऱ्यांची भेट घेणार आहे.

तसेच 6 महिण्याच्या कालावधीत समस्त गावकरी भक्तांच्या उपस्थितीत गोंधळ घालणे वगैरे विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. यात्रेदिवशी म्हणजे पुढील वर्षी 12 फेब्रुवारी 2025 रोजी ग्रामदेवता श्री महालक्ष्मी देवीचे अक्षता रोपण व अन्य महत्त्वाचे धार्मिक विधी होणार आहेत. अक्षता रोपणाचा विधी सलग अकरा दिवस चालणार आहे.

नंदगडची ग्रामदेवता श्री महालक्ष्मी यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे अक्षता रोपणानंतर देवीचे गावभर भ्रमण होऊन पाचव्या दिवशी ती गदगेवर स्थानापन्न होणार आहे. तत्पूर्वीचे चार दिवस ती गावात ठीकठिकाणी वस्तीला राहणार असून या कालावधीत सांस्कृतिक कार्यक्रमांसह इतर कार्यक्रम होणार आहेत.

Nandgad mahalaxmi yatra 2025, nandgad reda sodne

Khanapur Nandgad

Shri laxmidevi nandgad

nandgad photos, nadgad dam , nandgad Temple

nandgad news, khanapur news, khanapur live, khanapurvarta

Source Belgaumlive

Back to top button
error: Content is protected !!
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा! ashadhi ekadashi quotes in marathi: Ashadhi ekadashi 2025: आषाढी एकादशीचे महत्त्व digital fast: डिजिटल उपवास: फायदे आणि तोटे कामाचा ‘6-6-6’ नियम: कमी वेळेत जास्त यश! सोन्याच्या दरात आणखी घसरण! आजचे ताजे भाव जाणून घ्या