खेळ

बेंगळूरू आयपीएल मध्ये कायम, चेन्नई बाहेर

बेंगळूरू:  येथे झालेल्या अटीतटीच्या सामन्यात बेंगळूरूने आपल्या होम ग्राऊंड मध्ये चेन्नईला हरवत  आयपीएल 2024 मध्ये आपली कप जिंकण्याची आशा कायम ठेवली आहे.

चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यातील सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला

फाफ डु प्लेसिसच्या अर्धशतकासह विराट कोहली आणि रजत पाटीदार यांच्या खेळीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध २० षटकांत ५ बाद २१८ धावांपर्यंत मजल मारली. नंतर फलंदाजीसाठी आलेल्या चेन्नई संघाने सुरुवातीला विकेट्स गमावल्याने सुरूवात खराब झाली. ऋतुराज शून्य वर बाद झाला. नंतर राहणे ने खेळ थोडा सांभाळला पण पुन्हा विकेट्स गेले. शेवटी धोनी आणि जडेजा यांनी संघाला 200 च्या जवळ आणले होते पण ते अपयशी ठरले

RCB टीम प्लेऑफमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने कमालीची कामगिरी करत प्लेऑफमध्ये एंट्री मारली आहे. प्लेऑफमध्ये धडक मारणारी RCB टीम ही चौथी टीम ठरली आहे. यश दयालने कमालीची गोलंदाजी केली आणि तो आरसीबीसाठी तारणहार ठरला. त्याच्या शेवटच्या षटकातील उत्कृष्ट गोलंदाजीनेटीमला विजय मिळवून दिला. नावाजलेल्या चेन्नईचा 27 धावांनी पराभव करत आऱसीबीने आतापर्यंचां सर्वात मोठा विजय मिळवला आहे. सुरूवातीच्या सामन्यांमध्ये काही चुका आणि सलग पराभवाने  संघाच्या कामगिरीवर टिका झाली. पण त्यानंतर आऱसीबीने संघ आपल्यात बदल करत एकापेक्षा एक विजय मिळवले आणि आता आपला दावा ठोकला. फक्त विजयच नाही तर सर्व संघांना मागे टाकत प्लेऑफमध्ये धडक मारली आहे.

फाफ डू प्लेसिसच्या आरसिबी संघाचा हा सलग सहावा विजय आहे. पहिली फलंदाजी करताना आरसीबीने 5 विकटच्या मोबदल्यात 218 रण केले. प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी चेन्नई संघाला 200 किंवा त्यापेक्षा कमी धावसंख्येवर रोखाल्यास आरसीबी सिरिज मध्ये जिवंत राहणार होती.  अनेक प्रयत्नांनंतरही चेन्नईचा संघ 7 गडी  गमवून  191  धावाच करू शकला.

Rcb Beat Csk By 27 Runs Royal Challengers Bengaluru Into The Playoffs Of Ipl 2024 Ipl 2024 Bdg
RCB in Playoffs:

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते