खानापूर

गणेबैल टोलनाक्याचा मनमानी कारभार :कॉंग्रेसचे रास्ता रोको आंदोलन

सलग दोन तास रास्ता रोको

खानापूर: गणेबैल येथील टोलनाक्यावर टोलनाक्याच्या मनमानी कारभाराला कंटाळून येथील नागरिक, शेतकरी आणि कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी टोल नाक्यावर रास्ता रोको करून आंदोलन करण्यात आले. कित्तेक महिने उलटून गेले तरी NHAI ने व केंद्र सरकार ने आपला शब्द पाळला नाही. शेतकऱ्यांना भरपाई दिली गेली नाही.  तसेच टोलपासून साधारण 5 किमी च्या अंतरातील सर्व गावातील वाहनांना टोल माफी मिळायला हवी. या मुद्यावरून कॉंग्रेस कार्यकर्ते व शेतकऱ्यांनी आवाज उठवला.

गणेबैल टोलनाक्यावर बीजेपीच्या वेगवेगळ्या गाड्यांची लिस्ट

गणेबैल टोकनाक्यावर टोलमाफी असणाऱ्या गाड्यांची लिस्ट लावली आहे. त्यामधे आमदारांना टोलमाफी दिली आहे. पण या गाडीबरोबर अशा 10 गाड्यांची लिस्ट आहे यामधे लैला शुगर च्या गाड्यांना टोलमाफी मिळाली आहे. तसेच खानापूर बीजेपीतील काहींना टोलमाफी मिळाली आहे. यामुळे फक्त सामान्य जनतेला टोलमाफी का नाही असा सवाल यावेळी करण्यात आला. याची सत्यता तपासण्याचे काम पोलीस प्रशासनाने करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. आणि यावर कायदेशीर कारवाई झाली पाहीजे अशी मागणी करण्यात आली.

तसेच ज्या ज्या बीजेपीच्या लोकांच्या गाड्या गणेबैल टोलवर टोल न भरता सोडून दिल्या जात होत्या त्या सर्व गाड्याविरूद्ध तसेच टोलच्या अधिकाऱ्यांविरूद्ध पोलीस तक्रार यावेळी कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी दिली. यावेळी कायदेशीर तपास करण्याचे आश्वासन पोलीस प्रशासनाने दिले.

याची पुर्तता न झाल्यास “जेल भरो आंदोलन”

वरील सर्व बाबींची पुर्तता न झाल्यास येत्या 10 जूनला “जेल भरो आंदोलन” छेडण्यात येणार असल्यास यावेळी कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी सांगितले.

यावेळी खानापूर सीपीआय व टोलनाक्यावरील अधिकाऱ्यांनी मिळून एसी व डीसी याच्याशी बोलणे करून देण्यात आले, सर्व सरकारी अधिकारी 4 जून च्या मतमोजणी प्रक्रियेत व्यस्त असल्यामुळे 5 जून नंतर नक्की भेटू अशी विनंती अधिकाऱ्यांनी केली ती मान्य करण्यात आली आहे.

यावेळी ॲड. ईश्वर घाडी साहेब,सुरेश भाऊ, यशवंत बीरजे, विनायक मुतगेकर, प्रसाद पाटील, रमेश पाटील, जोतीबा गुरव,रूद्राप्पा पाटील,महादेव गुरव, रामचंद्र पाटील, तोहीत चांदखन्नावर, इसाक पठाण तसेच पत्रकार वासुदेव चौगुले, विवेक गिरी, प्रसन्ना कुलकर्णी तसेच स्थानिक शेतकरी, जनता, गाड्यांचे मालक कार्यकर्ते उपस्थित होते.

गणेबैल टोलनाक्यांवर टोलमाफी दिलेल्या गाड्यांची लिस्ट

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते