खानापूर
खानापूर: ऐन दिवाळीत मुसळधार, भात पिकांचे नुकसान शेतकऱ्यांची चिंता वाढली
खानापूर: खानापूर तालुक्यात ऐन दिवाळीत मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या भात पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही शेतकऱ्यांनी भात कापणी केली होती, पण कापलेले भात पाऊस पडून भिजल्याने दिवाळीच्या सणात त्यांच्या चिंता वाढल्या आहेत.
हलगा ता. खानापूर येथील कापलेले भात
सप्टेंबरपर्यंत झालेल्या पावसामुळे भात पीक जोमदार आले होते. तथापि, पण आता सुरू झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचे चिंता वाढवली आहे. अनेक ठिकाणी कापलेली भातशेती पाण्यात बुडाल्याने मोठे नुकसान झाले आहे.