देसूर: परिसरात धावत्या रेल्वेखाली सापडून एका अज्ञात तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून, याबाबतची नोंद रेल्वे पोलिसांनी केली आहे.

मृत तरुणाचे अंदाजे वय ३५ ते ४० वर्षे दरम्यान असून, उंची सुमारे ५ फूट आहे. त्याचा रंग गव्हाळ, शरीरयष्टी सदृढ, चेहरा लांबट, नाक सरळ, केस काळे असून त्याने दाढी आणि मिशा वाढवलेल्या आहेत.
विशेष ओळखीच्या खुणांमध्ये मृताच्या उजव्या हातावर “I Love Govinda” असे लिहिलेले आहे. दुसऱ्या हातावर फुलाचे चित्र कोरलेले असून, मानेवर फुलपाखराचे गोंदण आहे. त्याशिवाय एका पायात काळा रबर बांधलेला आहे.
या वर्णनाशी जुळणाऱ्या व्यक्तीबाबत कोणाला काही माहिती असल्यास त्यांनी रेल्वे पोलिसांशी 0831-2405273 अथवा 9480802127 या क्रमांकांवर तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.