क्राईम

प्रेम करत असलेली मुलगी न मिळाल्याने एकाची आत्महत्या

मच्छे : प्रेयसीच्या विरहातून एकाने गळफास घेऊन
राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना रविवारी मच्छे येथे सकाळी दहाच्या सुमारास उघडकीस आली. रोहित संजय पाटील (वय २६) असे त्याचे नाव आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, रोहित हा दुसऱ्या रेल्वे फाटकानजीक असलेल्या एका खासगी कंपनीत काम करत होता. त्याच कंपनीत काम करणाऱ्या एका तरुणीशी त्याचे प्रेमसंबंध जुळले होते. मात्र, कंपनीने फीडबॅक चांगला नाही असे कारण सांगत दोघांनाही कामावरुन कमी केले होते.

त्यामुळे, रोहित सध्या पुण्यात काम करत होता. शनिवारी (दि. ३) तो गावात परतला होता. मात्र, प्रेम करत असलेली मुलगी आपल्याला मिळत नसल्याचे लक्षात येताच तो निराश झाला होता. याच नैराश्यातून त्याने डेथ नोट लिहून रविवारी पहाटे ५.३० ते १० या वेळेत राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
बेळगाव ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा
केला.

Back to top button
digital fast: डिजिटल उपवास: फायदे आणि तोटे कामाचा ‘6-6-6’ नियम: कमी वेळेत जास्त यश! सोन्याच्या दरात आणखी घसरण! आजचे ताजे भाव जाणून घ्या डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? फसवणूक कशी होते? काय करावे digital arres अल्लू अर्जुन याला का अटक झाली?