‘एक देश एक निवडणूक’ प्रस्तावाला मंजुरी, लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुका एकाच वेळी
One Nation one Election : गेल्या काही वर्षापासून चर्चित एक देश एक निवडणुकीच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकितत मंजुरी मिळाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली.
केंद्रीय सरकारने’एक देश, एक निवडणूक’ (One Nation one Election) या धोरणाला आज मंजुरी दिली. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली’एक देश, एक निवडणूक’ धोरणाच्या अभ्यासासाठी एक समिती गठित करण्यात आली होती. या समितीने’एक देश, एक निवडणूक’ धोरणाबाबत सर्वांगीण अध्ययन करून आपले अनुकूल मत दर्शवत एक अहवाल सरकारला सादर केला होता. हा अहवाल केंद्रीय मंत्रिमंडळाने आज मंजूर केल्याने देशात आता एक देश एक निवडणूक धोरणाचा मार्ग मोकळा झाला आहे.
या समितीने पहिल्या टप्प्यात लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुका एकाच वेळी घेण्याची शिफारस केली होती आणि त्यानंतर १०० दिवसांच्या कालावधीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रित करण्याची शिफारस केली होती.
एक देश एक निवडणुकीमुळे विविध पातळ्यांवर अनेक वर्षांपासून रखडलेल्या निवडणुकांची वारंवारता कमी होईल तसेच वारंवार होणाऱ्या निवडणुकांचा आर्थिक आणि प्रशासकीय बोजा कमी करण्लयाचा उद्देश्य या प्रस्तावाचा आहे.
या प्रस्तावाला भाजपमधील अनेकांनी पाठिंबा दिला असला तरी इतर राजकीय पक्ष काय प्रतिसाद देतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
One nation, one election’ cleared by Union Cabinet
what is One nation, one election
#onenationoneelection