राजकोट किल्ल्यावर मोठा राडा, ठाकरे आणि राणे समर्थक एकमेकांना भिडले
Shivaji Maharaj Statue Collapse | मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. मालवणमध्ये महाविकास आघाडी mahavikas aghadi rada आणि भाजपचे कार्यकर्ते आमनेसामने आले आहेत. दरम्यान, ठाकरे आणि राणे यांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. परिस्थिती नियंत्रणात आणून दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना रोखण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे.
Malavan: आज मालवणमध्ये महाविकास आघाडीकडून जनसंताप मोर्चाचं आयोजन करण्यात आले आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीचे नेते आज मालवणमध्ये आहेत. या मोर्चात जयंत पाटील आणि आदित्य ठाकरे Aditya Thakare उपस्थित आहेत. मालवणमध्ये भाजपचे नेते नारायण राणे दाखल होताच कार्यकर्त्यांनी आदित्य ठाकरेंविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली होती.
दरम्यान आदित्य ठाकरे आणि नारायण राणे Narayan Rane एकमेकांसमोर आले होते. तेव्हा कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. पोलीस कार्यकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यामुळे सध्या कार्यकर्त्यांमध्ये मोठं संतापाचं वातावरण निर्माण झाले आहे. गडावरच दोन्ही गटाचे कार्यकर्ते भिडले आहे. तर आदित्य ठाकरे कार्यकर्त्यांना घोषणाबाजी थांबावण्याचं आवाहन करत आहे. राणे समर्थकांनी मात्र आक्रमक भूमिका घेतली आहे. दरम्यान, मागील दीड तासांपासून आदित्य ठाकरे येथे ठिय्या आंदोलन करत आहे. यावेळी जयंत पाटील यांनी देखील मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला.
आदित्य ठाकरे काय म्हणाले? आदित्य ठाकरे यांनी राजकोट किल्ल्याची पाहणी केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला, तेव्हा ते म्हणाले , “माझ्याकडे बोलण्यासाठी शब्द नाहीत. पुतळ्यात भाजपवाले चोरी, भ्रष्टाचार करु शकतात हे आमच्या आकलनाच्या बाहेर आहे, तरी त्यांनी करुन दाखवलं आहे. पंतप्रधानांना खूश करायचं, त्यांच्याकडून कार्यक्रम करुन घ्यायचा यासाठी हे झालं आहे. काल एक निर्लज्ज मंत्री येथे आले आणि यातून चांगलं काहीतरी करु असं म्हणाले. याचा अर्थ याच्यातून अजून पैसे कमवायचे आहेत. स्टॅच्यू ऑफ लिबर्टी यापेक्षा जास्त वारे सहन करतो. मग तुमच्या मनात महाराजांबद्दल द्वेष का ?” अशी विचारणा आदित्य ठाकरेंनी Aditya Thakare केली आहे.
Shivaji statue collapse
chhatrapati shivaji maharaj statue collapse
shivaji maharaj statue collapse
Corruption has peaked under Mahayuti government: Uddhav Thackeray on Shivaji Maharaj statue collapse