‘यात्रेसाठी नंदगड सज्ज,एफएफसीचे
‘कडेकोट बंदोबस्त! मिशन’
खानापूर: नंदगड, सनहोसुर आणि भंडरगाळी येथे उद्या 12 फेब्रुवारीपासून महालक्ष्मी यात्रा सुरू होत आहेत. नंदगड येथे 25 वर्षानंतर यात्रा भरत असल्याने मोठी गर्दी होणार असल्याने या यात्रेच्या सुरक्षा आणि व्यवस्थापनासाठी बेळगावच्या फेसबुक फ्रेंड्स सर्कलने(एफएफसी) जबाबदारी घेतली आहे. संतोष दरेकर, अवधूत तुडवेकर आणि पद्मप्रसाद हुली यांच्या नेतृत्वाखालील हे पथक आज रात्रीपासून नंदगड येथे कार्यरत होणार आहे.
एफएफसी पथक नंदगड पोलिसांसोबत समन्वय साधून यात्रेची सुरक्षितता सुनिश्चित करणार आहे. आपत्ती व्यवस्थापनासाठी चार अग्निशामक यंत्रे आणि लाइफ बुओस यांसारखी साधने सज्ज ठेवण्यात आली आहेत.
यात्रेदरम्यान तीन मुख्य तलाव आणि मोकळ्या विहिरींमुळे नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच जंगल परिसर आणि वाहन पार्किंगजवळ आगी पेटवू नयेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
गावातील रस्ते अरुंद असल्याने भाविकांनी गर्दी टाळावी, तसेच हरवलेल्या व्यक्तींना त्यांच्या कुटुंबियांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत कक्षाची व्यवस्था करण्यात आली आहे. सीसीटीव्ही आणि प्रोजेक्टर स्क्रीनच्या मदतीने संपूर्ण यात्रा क्षेत्रावर लक्ष ठेवले जाणार आहे.
यात्रेची सुरक्षा आणि व्यवस्थापन यशस्वी करण्यासाठी एफएफसीचे विशेष प्रयत्न सुरू आहेत.
