क्राईम

खानापूर नंदगड येथे विवाहीत महिलेची आत्महत्या, पतीला अटक

खानापूर : हुंड्यासाठी सासरच्या मंडळींकडून वारंवार होत असलेल्या छळाला कंटाळून खानापूर तालुक्यातील नंदगड येथील एका नवविवाहितेने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. अर्शअहमदी मुदस्सर बसरीकट्टी (19) रा. काझी गल्ली असे मयत विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी पती मुदस्सर रियाज अहमद बसरीकट्टी (32) यास अटक करण्यात आली आहे.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, अर्शअहमदी हिचे माहेर खानापूर तालुक्यातील गोलिहळ्ळी आहे.

याच वर्षी जून महिन्यात मुदस्सर याच्याशी तिचा विवाह झाला होता. तेव्हापासून हुंड्यासाठी सासरच्या लोकांकडून छळ सुरू होता. छळाला कंटाळून अर्शअहमदी गोलिहळ्ळी या आपल्या माहेरी गेली होती. आठ दिवसापूर्वी पुन्हा तिला सासरच्या मंडळींनी बोलावून आणले होते. पण त्या त्रस्त विवाहितेने सासरच्या वारंवार जाचाला कंटाळून गेल्या सोमवारी विष प्राशन केले होते. तातडीने तिला खानापूर सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. तिथून अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात आल्यानंतर सदर प्रकरणी पोलिसात कळवण्यात आले व एमएलसी झाली होती.
सदर विवाहितेच्या उपचारासाठी अधिक प्रयत्न करण्यात आले. परंतु तिच्यावर उपचार झाला नाही. सोमवारी दुपारी तिचा रुग्णालयात मृत्यू झाला.

Back to top button
डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? फसवणूक कशी होते? काय करावे digital arres अल्लू अर्जुन याला का अटक झाली? महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते