खानापूर

नंदगड यात्रेपूर्वी वीज पाणी रस्ते व आरोग्य सुविधा ठीक करा: उत्सव कमिटीने घेतली आमदारांची भेट

खानापूर: येत्या 12 फेब्रुवारी 2025 पासून नंदगड ग्रामदेवता श्री लक्ष्मीदेवी यात्रोत्सवाला सुरुवात होणार आहे. उत्सवाची पूर्वतयारी व पायाभूत सुविधांसाठी नंदगड येथे आमदार विठ्ठलराव हलगेकर यांनी तहसीलदार सह सर्व खात्यांच्या अधिकाऱ्यांची बैठक घ्यावी व यात्रा उत्सवापूर्वी वीज पाणी रस्ते वाहतूक व आरोग्य संबंधित सुविधा सर्व समस्यांची निवारण करावे असे उत्सव कमिटीच्या वतीने आमदार विठ्ठलराव हलगेकर यांना सांगण्यात आले.

आमदार हलगेकर यांनी येत्या आठवड्याभरात सर्व खात्यांच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलवण्यात येईल त्याद्वारे पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील असे सांगितले. नंदगड हे एक ऐतिहासिक स्थळ असल्यामुळे ही श्री लक्ष्मी देवीची यात्रा मोठ्या उत्साहाने व सर्व सुविधायुक्त करूया यामध्ये मी जातीनिशी लक्ष घालीन असे आश्वासन यावेळी आमदार विठ्ठलराव हलगेकर यांनी उत्सव कमिटीला दिले.

यावेळी उत्सव कमिटी तर्फे आमदार श्री हलगेकर सरांचा सत्कार करण्यात आला यावेळी उत्सव कमिटीच्या अध्यक्ष सहित सर्व पदाधिकारी गावातील मानकरी व जेष्ठ मंडळी उपस्थित होते.

Nandgad shri mahalaxmi yatra 2025

Nandgad khanapur mahalaxmi yatra 2025

Related Articles

महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते