खानापूर

नंजिनकोडल-दोड्डेबैल रस्त्यावर भगदाड,रहदारी ठप्प

खानापूर : नंजिनकोडल-दोड्डेबैल संपर्क रस्ता पहिल्याच पावसाच्या तडाख्याने या मोरीवरील रस्ता खचला आहे. रस्ता खचलेल्या ठिकाणी दरीसारखी परिस्थिती निर्माण झाल्याने सर्व प्रकारची रहदारी ठप्प झाली आहे.

पंधरा दिवसांपूर्वी शेतवडीतील मोरीच्या पुलाला भगदाड पडले होते. ग्राम पंचायतीने मुरुम टाकून तात्पुरती दुरुस्ती केली होती. पण, मंगळवारी (दि. 13) आज बाजूपट्ट्यांसह रस्ताच खचल्याने दोन्ही गावांचा एकमेकांशी असलेला संपर्क तुटला आहे.
डांबरीकरणानंतर अवघ्या दोनच महिन्यात दोन ठिकाणी भगदाड पडले.

त्यामुळे, पंचायत राज विकास खात्याच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नंजिनकोडल ग्राम पंचायतीच्या अखत्यारीतील या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

कॉंग्रेस पक्षाचे युवा नेते साईश सुतार यांनी निंजनकोडल – दोडेबैल रोडच्या पूलावर जाऊन परिस्थितीची पहाणी केली.
आमदार साहेबांनी ताबडतोब लक्ष घालून या पूलाचे काम मार्गी लावावे. अशी त्या भागातील लोकांनी मागणी केली आहे.

Related Articles

महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते