खानापूर

“माझ्या आत्महत्येसाठी पत्नी जबाबदार” पतीने आत्महत्ते आधी लिहिली चिठ्ठी

शिवशक्ती कॉलनी, अनगोळ येथे तरुणाची आत्महत्या; मृत्यूपत्रात पत्नीला ठरवलं जबाबदार

बेळगाव | प्रतिनिधी
शहरातील अनगोळमधील शिवशक्ती कॉलनीत शुक्रवारी एक दु:खद घटना घडली. सुनील मुळेमणी (वय 33) या तरुणाने पत्नीच्या मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. विशेष म्हणजे, त्याने मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत स्पष्टपणे नमूद केलं आहे की, “My wife is the reason for my suicide” (माझ्या आत्महत्येसाठी माझी पत्नी जबाबदार आहे).

सुनील मुळेमणी हे श्रीराम कॉलनी, अनगोळ येथील रहिवासी होते. काही काळापासून ते पत्नी आणि मुलीपासून वेगळे राहत होते. ते कंप्युटर दुरुस्तीचा व्यवसाय करत असून, शिवशक्ती कॉलनीमध्ये भाड्याच्या जागेत त्यांचं दुकान सुरू होतं.

शुक्रवारी सकाळी सुनील यांनी आपल्या दुकानातच वायरच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच उद्यमबाग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृत्यूच्या कारणाचा तपास सुरू केला. पोलिसांच्या हाती सुनीलने लिहिलेली मृत्यूपत्र सापडली असून, त्यात पत्नीच्या वागणुकीमुळे आत्महत्येचा निर्णय घेतल्याचा उल्लेख आहे.

या प्रकारामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, वैवाहिक जीवनातील मानसिक तणाव किती गंभीर पातळीवर जाऊ शकतो, याचे हे विदारक उदाहरण ठरत आहे. उद्यमबाग पोलीस ठाण्यात या प्रकरणी नोंद करण्यात आली असून, अधिक तपास सुरू आहे.

Back to top button
error: Content is protected !!
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा! ashadhi ekadashi quotes in marathi: Ashadhi ekadashi 2025: आषाढी एकादशीचे महत्त्व digital fast: डिजिटल उपवास: फायदे आणि तोटे कामाचा ‘6-6-6’ नियम: कमी वेळेत जास्त यश! सोन्याच्या दरात आणखी घसरण! आजचे ताजे भाव जाणून घ्या