खानापूर

खुशखबर! आमदारांच्या विशेष प्रयत्नातून खानापूर तालुक्यातील या रस्त्यांच्या कामांना सुरुवात


खानापूर:  तालुक्यातील पाच प्रमुख रस्त्यांच्या विकास कामासाठी आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या विशेष प्रयत्नातून निधी मंजूर करण्यात आला असून त्या पाच रस्ता कामांच्या पूजनाचा उद्या गुरुवार दि. 19 सप्टेंबर रोजी विविध ठिकाणी शुभारंभ करण्यात येणार आहे. l 

सकाळी 10 वाजता हेम्माडगा ते सिंधनुर या राज्य मार्गापैकी 1.56 लाखाच्या निधीतून मंजूर झालेल्या हारुरी क्रॉस फॉरेस्ट चेकपोस्ट नाक्यापासून शुभारंभ करण्यात येणार आहे.

त्यांनतर 11.00 वाजता खानापूर ते ताळीगुप्पा 10 कोटी रुपये मंजूर असलेल्या रस्त्याचे भूमिपूजन, करंबळ क्रॉस या ठिकाणी होणार आहे. 

त्यांनतर 12.00 वाजता येडोगा ते हडलगा 1कोटी 85 लाख रुपये, मंजूर असलेल्या रस्त्याचे भूमिपूजन अल्लेहोळ क्रॉस (चापगांव) या ठिकाणी होणार आहे.

त्यांनतर 1.00 वाजता कोडचवाड येथील एससी कॉलनीतील 24 लाख रुपये मंजूर असलेल्या सीसी रस्त्याचे भूमिपूजन होणार आहे.

त्यांनतर  2.00 वाजता पारिश्वावाड ते नागरगाळी 10 कोटी रुपये मंजूर असलेल्या रस्त्याचे भूमिपूजन पारीश्वाड या ठिकाणी होणार आहे.

Related Articles

महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते