खानापूर
खानापूर तालुक्यातील युवक बेपत्ता
हलगा (ता. खानापूर) : हलगा येथील युवक मारुती उर्फ तुषार तुकाराम सुतार (वय 29) हा दिनांक 27 ऑगस्ट रोजी संध्याकाळी घरातून बाहेर पडून बेपत्ता झाला आहे. तो सध्या बेळगाव परिसरात असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

बेपत्ता युवकाचा फोटो ओळखीचा असल्यास किंवा तो दिसल्यास कृपया मोबाईल क्रमांक 9480328217 किंवा 9945369245 यावर तातडीने संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
तुषार हा भजनाची आवड असलेला युवक असून, तो शक्यतो कलावती आईच्या भजन कार्यक्रमात किंवा कोणत्याही शिवालयामध्ये आढळून येऊ शकतो, अशी माहिती कुटुंबीयांनी दिली आहे.


