खानापूर

खानापूर-लोंढा मार्गावर नग्न मनोरुग्ण, माणिकवाडी येथील तरुणांनी केले काही असे

जे का रांजले गांजले त्याची म्हणे जो आपुले तोचि साधू ओळखावा देव तेथेची जाणावा” असे संत तुकाराम महाराज सांगून गेले. याची अनुभूती क्वचितच येते. पण अशीच अनुभूती आज गुरुवारी खानापूर तालुक्यातील माणिकवाडी जवळ आली.

खानापूर: गुरुवारी खानापूर तालुक्यातील माणिकवाडी जवळ बंगळूरहून भरकटत खानापूर पर्यंत पोहोचलेल्या आणि पावसात चिंबून कुडकुडणाऱ्या इसमाला माणिकवाडी येथील तरुणांनी मायेची उब दिली आहे. या घटनेने अक्षरशः पोलीस देखील गहिवरले. मनोरुग्ण असलेला एक इसम खानापूर लोंढा मार्गावर फिरत असताना अनेकांनी पाहिला होता पण त्याची विचारपूस करण्याची तसदी मात्र कोणीच घेतली नव्हती. मात्र आज सकाळी माणिकवाडी येथील ग्रामपंचायत सदस्य प्राध्यापक शंकर गावडा हे गुरांसाठी चारा आणण्यासाठी शेतात जात असताना सदर इसम त्यांना पूर्णतः नग्नावस्थेत दिसला. तो रात्रभर पावसात भिजल्याने थंडीने कुडकुडत होता शंकर गावडा यांनी त्या इसमाची अवस्था पाहून तात्काळ त्याचे सहकारी ज्ञानेश्वर गावडा, पांडुरंग पाटील, शंकर पाटील यांच्या मदतीने त्या इसमाला उपदार कपडे दिले व खानापूर पोलिसांशी संपर्क साधला.

घटना समजल्यानंतर पोलीस जयराम यांनी देखील घटनास्थळी धाव घेत त्या इसमाला रुग्णवाहिका बोलावून खानापूर शासकीय इस्पितळात दाखल केले.

सदर व्यक्ती आरटी नगर बंगळूर येथील असल्याचे समजते. मुलीच्या लग्नाची ताटातूट झाल्याने मानसिक अस्वस्थतेतून ते इथवर आल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले.

सदर इसम पावसामध्ये ओलाचिंब होऊन फिरताना त्याला मदतीचा हात देत प्राध्यापक शंकर गावडा त्यांचे सहकारी आणि पोलीस जयराम यांनी दाखवलेली तत्परता आणि माणुसकी बद्दल त्यांची वाहवाह होत आहे. सदर इसमाची कोणाला ओळख असल्यास खानापूर पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आला आहे.




mentally ill Naked on Khanapur-Londha road


Related Articles

महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते