खानापूर

2 ते 6 फेब्रुवारी: कापोली येथे माऊली देवी यात्रोत्सव महाप्रसाद व सांस्कृतिक कार्यक्रम

खानापूर: कापोली केजी येथे सालाबादप्रमाणे ग्रामदेवता श्री माऊली देवीचा यात्रोत्सव रविवार, 2 फेब्रुवारीपासून गुरुवार, 6 फेब्रुवारीपर्यंत आयोजित करण्यात आला आहे. यात्रोत्सवाच्या निमित्ताने मंगळवार, 4 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 ते 3 या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच 3 फेब्रुवारीपासून हाफ पीच क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

मंगळवारी रात्री 9 वाजता ‘गाथा शिवरायांची’ हा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला आहे. गुरुवारी, 6 फेब्रुवारी रोजी यात्रेची सांगता होणार आहे. सर्व भाविकांनी या यात्रोत्सवात सहभागी होऊन त्याची शोभा वाढवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

whatsapp
Back to top button
अल्लू अर्जुन याला का अटक झाली? महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते