धार्मिक कार्यक्रमात चेंगराचेंगरी, लहान मुलांसह 87 ठार
उत्तर प्रदेश: येथील हाथरस येथे मंगळवारी एका धार्मिक कार्यक्रमात झालेल्या चेंगराचेंगरीत महिला आणि तीन मुलांसह 87 जणांचा मृत्यू झाला.
द इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, उत्तर प्रदेशाच्या हाथरस येथील रतिभापूर गावात ही घटना घडली. या गावात आज साकार विश्व हरी भोले बाबा यांचा संत्सग आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला जवळपास 1500 नागरीक उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने महिलांचा समावेश होता. या कार्यक्रमाला स्थानिक प्रशासनाने परवानगीदेखील दिली होती. दरम्यान, सत्संग सुरू चेंगराचेंगरीची घटना घडली. यात जवळपास 87 जणांचा मृत्यू झाला.
हाथरस मधील सिकंदरा राव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात चेंगराचेंगरी झाली. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. हा खासगी कार्यक्रम असून उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी परवानगी दिली होती. प्रशासनाकडून सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती. तरी हि घटना घडली आहे.
एटाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. उमेश कुमार त्रिपाठी यांनी सांगितले की, आम्हाला 87 मृतदेह प्राप्त झाले आहेत, त्यापैकी काही लहान मुळे आहेत. काही जखमींना रुग्णालयात ही दाखल करण्यात आले आहे. तसेच ही घटना नेमकी कशी घडली यासंदर्भात तपास सुरू आहे, असेही ते म्हणाले.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेची दखल घेतली असून त्यांच्या सूचनेनुसार या घटनेच्या चौकशीसाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही मृतांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत.
87 killed, including children, in stampede at religious event in Uttar Pradesh
Hathras Stampede Incident, Bhole Baba Satsang , uttar pradesh satsang
#hathras #hathrasinceident #uttarpradeshsatsang