
बेळगाव: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (मनरेगा) नोंदणीकृत सर्व सक्रिय कामगारांनी त्यांचे ई-केवायसी एनएमएमएस अॅपद्वारे अपडेट करावे, असे जिल्हा पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी एका निवेदनात म्हटले आहे.

मनरेगा योजनेअंतर्गत कामगारांच्या उपस्थितीत पारदर्शकता आणण्यासाठी ई-केवायसी (रोजगार कार्डशी जोडलेले आधार) द्वारे कामगारांची माहिती अपडेट केली जात आहे. जिल्ह्यातील ५०० ग्रामपंचायतींमध्ये ६,०३,६२७ सक्रिय कामगारांचे ई-केवायसी केले जात आहे. यासाठी कामगारांनी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना रोजगार कार्ड आणि आधार कार्ड अशी आवश्यक माहिती द्यावी. आतापर्यंत जिल्ह्यातील ८७८० कामगारांची माहिती ई-केवायसीद्वारे अपडेट करण्यात आली आहे. सर्व नोंदणीकृत सक्रिय कामगारांनी ३१ ऑक्टोबरपर्यंत ई-केवायसी करणे आवश्यक आहे आणि अधिक माहितीसाठी संबंधित ग्रामपंचायतीला भेट देऊन माहिती घ्यावी असेही त्यांनी सांगितले आहे.
