रंगपंचमी दिवशी मलप्रभा नदीत बुडून मृत्यू
खानापूर: गर्लगुंजी गावचे सुपुत्र व गर्लगुंजी पीकेपीएस सोसायटीचे मॅनेजर सातेरी मलाप्पा बिर्जे यांचे ज्येष्ठ सुपुत्र विशाल सातेरी बिर्जे (वय २५) यांचे रविवारी दुपारी सुमारे एक वाजण्याच्या सुमारास नदीत बुडून आकस्मिक निधन झाले. या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रंगपंचमीच्या निमित्ताने मित्रांसोबत रंग खेळल्यानंतर विशाल बिर्जे हे मित्रांसह खानापूर येथील मलप्रवाह नदीवर आंघोळीसाठी गेला होता आंघोळ करत असताना पाण्याचा योग्य अंदाज न आल्यामुळे ते अचानक खोल पाण्यात बुडाला.

विशाल यांना साधारण पोहता येत असल्याचे सांगितले जात असले तरी अचानक घडलेल्या या प्रसंगामुळे त्यांच्या मित्रांनी त्यांना वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळताच गावातील नागरिक तसेच आपत्कालीन सरकारी पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.

तब्बल दोन तासांहून अधिक काळ शोधमोहीम राबविल्यानंतर विशाल बिर्जे यांचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला. या दुर्दैवी घटनेमुळे गरलगुंजी गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
