हलगा श्री महालक्ष्मी मंदिर जीर्णोद्धारासाठी रेणुका वीर यांची तब्बल ₹1,01,251 ची देणगी | ಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿ ದೇವಾಲಯ ಜೀರ್ಣೋದ್ಧಾರಕ್ಕೆ ₹೧,೦೧,೨೫೧ ದೇಣಿಗೆ
हलगा (ता. खानापूर): हलगा गावातील श्री महालक्ष्मी मंदिराचा जीर्णोद्धार करण्याच्या ग्रामस्थांच्या निर्णयाला माहेरवाशीण सौ. रेणुका जोतिबा वीर यांनी मोठे आर्थिक पाठबळ दिले आहे. त्यांनी आपल्या दिवंगत आजी व वडिलांच्या स्मरणार्थ मंदिर जीर्णोद्धार कार्यासाठी तब्बल 1,01,251/- (एक लाख एक हजार दोनशे एकावन्न रुपये) रुपयांची उदार देणगी अर्पण केली आहे.
कै. थोरलाप्पा तुळसाप्पा रुपण (निवृत्त शिक्षक) आजी कै. पल्लुबाई तुळसाप्पा रुपण यांच्या स्मरणार्थ थोरल्याप्पा रूपन यांची कन्या सौ. रेणुका जोतिबा वीर या सध्या गोवा येथे वास्तव्यास असून, त्या मूळच्या शेंदोळी खुर्द येथील आहेत. माहेरच्या गावाशी आणि येथील श्री महालक्ष्मी मंदिराशी त्यांची नाळ जोडलेली असल्याने त्यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला.

याबाबत बोलताना सौ. रेणुका वीर यांचे पती श्री. जोतिबा वीर यांनी सांगितले की, ते गेल्या अनेक वर्षांपासून दीपज्योती कन्स्ट्रक्शन या व्यवसायात असून, त्यांचे हलगा गावाशी जुने स्नेहसंबंध आहेत. आपल्या माहेरसाठी आणि आजी व वडिलांच्या स्मरणार्थ काहीतरी करण्याची सौ. रेणुका वीर यांची इच्छा होती, म्हणून त्यांनी ही देणगी श्री महालक्ष्मी मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी देण्याचा निर्णय घेतला.
सौ. रेणुका वीर यांच्या या भरघोस सहकार्याबद्दल श्री महालक्ष्मी मंदिर जीर्णोद्धार कमिटीतर्फे त्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहेत. श्री महालक्ष्मी भक्ता कडून मिळणाऱ्या अशा योगदानामुळे जीर्णोद्धार कार्यास गती मिळणार आहे.

ಹಲಗಾ : ಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿ ದೇವಾಲಯ ಜೀರ್ಣೋದ್ಧಾರಕ್ಕೆ ₹೧,೦೧,೨೫೧ ದೇಣಿಗೆ
ಹಳಗಾ (ತಾ. ಖಾನಾಪುರ) : ಹಳಗಾ ಗ್ರಾಮದ ಕೇ. ಥೋರಲಪ್ಪ ತುಳಸಪ್ಪ ರೂಪಣ (ನಿವೃತ್ತ ಶಿಕ್ಷಕ) ಮತ್ತು ಕೇ. ಪಲ್ಲುಬೈ ತುಳಸಪ್ಪ ರೂಪಣ ಅವರ ಸ್ಮರಣಾರ್ಥವಾಗಿ, ಗ್ರಾಮದ ಮಾವನೂರಿನ ಸೌ. ರೇಣುಕಾ ಜೋತಿಬಾ ವೀರ (ಮು. ಶೇಂದೋಳಿ ಕುರುಡ್, ಪ್ರಸ್ತುತ ವಾಸ : ಗೋವಾ) ಇವರು ಶ್ರೀ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿ ದೇವಾಲಯದ ಜೀರ್ಣೋದ್ಧಾರಕ್ಕಾಗಿ ₹೧,೦೧,೨೫೧/- ದೇಣಿಗೆ ನೀಡಿರುವರು.
ಸೌ. ರೇಣುಕಾ ಹಾಗೂ ಅವರ ಪತಿ ಶ್ರೀ. ಜೋತಿಬಾ ವೀರ ಇವರು ದೀರ್ಘಕಾಲದಿಂದ ದೀಪಜ್ಯೋತಿ ಕಾನ್ಸ್ಟ್ರಕ್ಷನ್ ಎಂಬ ಸಂಸ್ಥೆಯ ಮೂಲಕ ವ್ಯಾಪಾರ ನಿರ್ವಹಿಸುತ್ತಿದ್ದು, ತಮ್ಮ ಮೂಲ ಊರಿನೊಂದಿಗೆ ಸದಾ ಬಾಂಧವ್ಯ ಕಾಯ್ದುಕೊಂಡಿದ್ದಾರೆ.
ಈ ಮಹತ್ವದ ಸಹಾಯಕ್ಕಾಗಿ ಶ್ರೀ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿ ದೇವಾಲಯ ಜೀರ್ಣೋದ್ಧಾರ ಸಮಿತಿಯ ಪರವಾಗಿ ಅವರಿಗೂ ಹೃತ್ಪೂರ್ವಕ ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನು ಸಲ್ಲಿಸಲಾಗಿದೆ.