बातम्या

लोंढा: शेतकऱ्यावर अस्वलांचा हल्ला

लोंढा : शेतात एका वृद्ध शेतकऱ्यावर तीन अस्वलांनी पाठीमागून हल्ला केल्याची घटना लोंढा येथे घडली आहे. अस्वलाच्या हल्ल्यात शेतकरी जखमी झाला असून अस्वलाच्या तावडीतून सुटका करण्यासाठी त्याने धाडसाने दगड फेकला. ही घटना लोंढा येथे घडली. दगडाने वार केल्यानंतर शेतकऱ्याला सोडून तीन अस्वल पळून गेले.

सकाळी नेहमीप्रमाणे प्रभू शिनुटगेकर आपल्या शेतात जाण्यासाठी निघाले होते. शेतात जाण्याच्या वाटेवर घनदाट जंगल आहे. त्यावेळी अचानक मागून काही आवाज आला आणि शेतकऱ्यावर अचानक तीन अस्वलांनी हल्ला केला. या शेतकऱ्याला बेळगावच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अस्वलाच्या हल्ल्याची माहिती मिळताच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी प्रभू शिनुटगेकर यांची भेट घेऊन माहिती घेतली.

Londa: An old farmer was attacked from behind by three bears while walking in the field. The farmer was injured in the attack of the bear and he bravely threw a stone to free himself from the clutches of the bear. The said incident took place in Londha. Three bears ran away leaving the farmer after being hit by a stone. In the morning, as usual, Lord Shinutgekar had left for his farm. There is a forest on the way to their farm. He came to the village and informed that the farmer was suddenly attacked by three bears coming from the forest. The farmer has been admitted to the district hospital of Belgaum for treatment. As soon as the news of the bear attack came to light, the forest department employees met Prabhu Shinutgekar and got the information.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते