बातम्या

आता सरकारी अंगणवाड्यांमध्ये एलकेजी आणि यूकेजी

बेळगांव: राज्यातील सर्व अंगणवाडी केंद्रांचे अद्ययावतीकरण (updation) करण्यास मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सहमती दर्शवली आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर Laxmi Hebbalkar यांनी दिली.

कल्याण कर्नाटक क्षेत्र वगळता नवीन अंगणवाडी केंद्रांमध्ये पूर्व प्राथमिक (एलकेजी, यूकेजी) lkg,ukg शिक्षण देण्याबाबत तज्ज्ञांची समिती स्थापन करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

अंगणवाडी केंद्रात Karnataka Anganwadi पूर्व प्राथमिक शिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला असून दर्जेदार शिक्षण व पोषण आहार देणे हे आमचे उद्दिष्ट आहे. यासंदर्भात अंगणवाडी केंद्रांचे अद्ययावतीकरण करण्यास मुख्यमंत्र्यांनी होकार दिला आहे.

विभागामार्फत मुलांना गणवेश, पुस्तके, दप्तर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच शाळांच्या धर्तीवर बदली पत्र (टीसी) देण्यासाठी पावले उचलली जाणार आहेत.

मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर Minister Laxmi Hebbalkar म्हणाल्या की, अंगणवाडी केंद्रांचे अद्ययावतीकरण आणि पूर्व प्राथमिक शिक्षण कन्नड व इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये देण्याची योजना आहे.

पूर्व प्राथमिक शिक्षण सुरू करण्याबाबत अंगणवाडी सेविकांशी चर्चा करण्यात आली आहे. कार्यरत अंगणवाडी शिक्षकांपैकी नऊ हजार पदवीधर आहेत.

1500 हून अधिक लोकांकडे पदव्युत्तर पदवी आहे. त्यामुळे दर्जेदार शिक्षण देण्यात कोणतीही अडचण येणार नाही, असे मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या

या बैठकीला शालेय व प्राथमिक शिक्षणमंत्री मधू बंगारप्पा, शिक्षण विभाग आणि महिला व बालकल्याण विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

lkg and ukg in Anganwadi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते