खानापूर-हेमाडगा रोडवर विचित्र करणी- जिवंत डुकराला गाडले
खानापूर-हेमाडगा रोडवर रुमेवाडी जवळील विलास बेडरे व ज्योतिबा बेडरे यांच्या शेतात भानामतीचे प्रकरण उघडकीस आले असून, खड्डा काढून जिवंत डुक्कर गाढल्याचे आढळून आले आहे,याचबरोबर लिंबू मिरची आदी वस्तूंचा ढीग आढळून आला आहे. , आजूबाजूला नारळ व इतर वस्तू आढळून आल्याने शेतकरी व नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.
खानापूर-हेमाडगा रस्त्यालगत असलेल्या रुमेवाडी येथील विलास बेडरे व जोतिबा बेडरे हे दोघे नेहमीप्रमाणे शेतात गेले असता त्यांना काही कुत्र्यांच्या ओरडण्याचा आवाज आला. दोघांनाही संशय आला आणि त्यांनी संपर्क साधला असता त्यांना हे करणी अडथळ्याचे प्रकरण असल्याचे आढळून आले. सदर ठिकाणी कुवाळे, अंदाजे 20 नारळ, पान विडे, लिंबू, बिब्बे, हळकुंडे, मोहरी, तसेच जंगली प्राण्याचे सुळे असे बरेच साहित्य आढळून आले. तसेच बाजूला खड्डा खणून त्यात जिवंत डुकराला पुरन्यात आले होते. पण कुत्र्यांनी माती उकरून डुकराला बाहेर काढले असल्याने. डुक्कर खड्याच्या बाहेर पडला होता. कुत्र्यांनी चावा घेतल्याने डुक्कर जखमी अवस्थेत पडून होता. डुकराचे चारी पाय दोरीने बांधलेल्या अवस्थेत होते. हे ठिकाण तीन गावच्या सीमेवर असल्याने, येथे वरचेवर लहान मोठ्या प्रमाणात असले जादुटोण्याचे व भानामतीचे प्रकार घडत आहेत.
A live pig was buried on Khanapur-Hemadga road.
live pig dinged in