खानापूर
नवसाला पावणाऱ्या श्री भावकेश्वरी मंदिरासाठी 1,30,000 रुपयांची देणगी
खानापूर: कुप्पटगिरी येथील नवसाला पावणाऱ्या भावकेश्वरी ग्रामदैवत मंदिराचा सध्या जीर्णोद्धार सुरू आहे. या जीर्णोद्धारासाठी गावातील भावकेश्वरी सैनिक संघटना समोर आली असून संघटनेतर्फे 1,30,000 रुपयांची भरघोस देणगी आज मंदीर कमिटीकडे सुपूर्द करण्यात आली.
खानापूर लैला शुगर जवळील व कुप्पटगिरी हद्दीतील भावकेश्वरी मंदिराचे काम सध्या स्लॅप लेव्हल आले असुन पुढील कामासाठी सैनिक संघटनेने आज एक लाख तीस हजार रुपये (1,30,000) रोख चेक कमिटीकडे देऊन मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी पुढाकार घेतला आहे.
त्यामूळे या संघटनेचे कुप्पटगिरी पंच कमिटी, बांधकाम कमिटी व गावकऱ्यांच्या वतीने आभार मानण्यात आले.
kuppatgiri khanapur
bhavkeswari Mandir kuppatgiri
Kuppatgiri, Karnataka
#Khanapurvarta #khanapur