खानापूर
कुप्पटगिरी सरकारी मराठी प्राथमिक शाळेला आदर्श शाळा पुरस्कार
खानापूर: शैक्षणिक वर्ष 2024 – 2025 सालातील आदर्श शाळा पुरस्कार कुप्पटगिरी सरकारी पूर्ण प्राथमिक मराठी शाळेला काल 5 सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त शुभम गार्डन येथे झालेल्या कार्यक्रमात देण्यात आला.
अनेक शाळांमधून कुपटगिरी शाळेची निवड करण्यात आली यामुळे खानापूर तालुक्यातून शाळेचे अभिनंदन करण्यात आले.
याचे संपूर्ण श्रेय गावकरी बंधू पालक वर्ग, मुख्याध्यापिका सौ. वंदना पाटील व संपूर्ण शिक्षक वर्ग ,एसडीएमसी अध्यक्ष श्री. विश्वनाथ बुवाजी व संपूर्ण कमिटी यांना जाते.
सर्वांचे खूप मोलाचे सहकार्य लाभले त्यानिमित्त सर्वांचे आभार मुख्याध्यापिका सौ. वंदना पाटील यांनी मानले.