खानापूर : साईश स्पोर्ट्स आयोजित खानापूर प्रीमियर लीग-2025 ही भव्य क्रिकेट स्पर्धा येत्या 19 ऑक्टोबर ते 26 ऑक्टोबर 2025 या कालावधीत खानापूरच्या मलप्रभा मैदानावर रंगणार आहे. ही ऑक्शन बेस क्रिकेट स्पर्धा असून खानापूर तालुक्यातील सर्व क्रिकेटप्रेमींमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

या स्पर्धेत 16 संघांना प्रवेश देण्यात आला असून प्रत्येक सामन्याचा फॉरमॅट 10 षटकांचा असेल. स्पर्धेसाठी 8 लाख रुपयांचा भव्य बजेट राखण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या स्पर्धेसाठी मुंबईहून नामांकित अंपायर आणि कॉमेंटेटर खानापूरला येणार असल्याने सामन्यांची रंगत अधिक वाढणार आहे.
खेळाडूंची नोंदणी सुरू असून 30 सप्टेंबर 2025* ही शेवटची तारीख आहे. नोंदणी फी ₹1500 इतकी असून, नोंदणी केलेल्या खेळाडूंनाच लिलावात संधी मिळणार आहे. भव्य लिलाव सोहळा 5 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता खानापूर येथील केदार मंगल कार्यालयात पार पडणार आहे.

स्पर्धेत आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. विजेत्या संघाला ₹2.5 लाख, तर उपविजेत्या संघाला ₹1.5 लाख इतके पारितोषिक मिळणार आहे. याशिवाय मॅन ऑफ द सीरीजला फ्रिज व ट्रॉफी, सर्वोत्कृष्ट फलंदाज व गोलंदाजाला सायकल व ट्रॉफी, तसेच सामनावीराला जर्सी (फायनलमध्ये बॅट) देण्यात येणार आहे.
या संपूर्ण स्पर्धेचे थेट प्रक्षेपण TennisCricket.in आणि YouTube Live वर करण्यात येणार आहे. आयोजक किरण पाटील यांनी सांगितले की, “ही स्पर्धा स्थानिक खेळाडूंना मोठ्या व्यासपीठावर खेळण्याची संधी उपलब्ध करून देणार आहे.
📌 संपर्कासाठी : 6361715291 / 8151999177