खानापूर

खानापूर प्रीमियर लीगचा थरार: 16 संघ, 4 लाखांची भव्य बक्षिसे

खानापूर: साईश स्पोर्ट्सचे मालक किरण पाटील यांच्या नेतृत्वाखाली  खानापूर प्रीमियर लीग सिजन 3 (KPL-3) क्रिकेट स्पर्धा 27 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर दरम्यान खानापूरच्या मलप्रभा क्रीडांगणावर रंगणार आहे. या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक 2 लाख रुपये, तर दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक 1 लाख रुपये खानापूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार विठ्ठलराव हलगेकर यांनी पुरस्कृत केले आहे.  याशिवाय या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाज यांना स्मार्ट LED टीव्ही, मॅन ऑफ द सीरीजसाठी सायकल, आणि फायनल मॅन ऑफ द मॅचसाठी ब्रँडेड वॉच दिले जाणार आहे.

यावर्षी या स्पर्धेतील सुरुवातीचा ऑक्शन कार्यक्रम 20 ऑक्टोबर रोजी केदार मंगल कार्यालय खानापूर येथे मोठ्या उत्साहात पार पडला. सर्व संघ मालकांनी बोली लावून खेळाडू खरेदी केले आहेत. स्पर्धेमध्ये 16 संघ सहभागी होणार असून, तालुक्याच्या विविध गावातून नावाजलेले खेळाडू निवडले गेले आहेत. त्यामुळे या स्पर्धेतील प्रत्येक सामना हा अधिक रोमांचक होणार आहे.

खानापूर तालुक्यातील हुशार खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा गेली दोन वर्षे किरण पाटील यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीरित्या पार पडली आहे. आणि यंदाचे तिसरे पर्व देखील गाजणार आहे.

यंदाच्या सहभागी संघांमध्ये: प्रणव स्पार्टन्स, एबीडी स्पोर्ट, प्रिंट झोन, एसएन पोल्ट्री, प्रेम राज, सिद्धेश्वर ग्रॅनाईट XI, विरेंद्र कुदळे पॅकर्स, मराठा वॉरियर्स, श्री सातेरी स्पोर्ट्स, ब्रम्हिणी स्पोर्ट्स, लँस स्पोर्ट्स, प्रणाली स्ट्रायकर्स, कलमेश्वर क्रिकेट क्लब अनगडी, एफसीसी बिडी, आणि एंजेल सोशल क्लब खानापूर यांचा समावेश आहे.

यावर्षी खानापूरवार्ता न्युज पोर्टलने सोशल मीडिया पार्टनर म्हणून साथ दिली असून, या रोमांचक स्पर्धेचे थेट प्रक्षेपण AB25 YouTube Live वर केले जाणार आहे.

Related Articles

महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते