खानापूर

किल्ला स्पर्धेने शिवमय झाले माणिकवाडी गाव, दिपावली निमित्त आयोजन

खानापूर: खास दीपावली निमित्त मौजे माणिकवाडी, तालुका खानापूर येथे श्री शंकर गावडा आणि श्री परशराम गोरल यांच्या संकल्पनेतून किल्ला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेच्या सजावटीमुळे संपूर्ण माणिकवाडी गाव शिवमय झाले होते. गावातील मुलांनी अती उत्साहाने भाग घेत जंजिरा, राजगड, प्रतापगड, पन्हाळा अशा विविध नयनरम्य आणि स्फूर्ती देणाऱ्या किल्ल्यांचे देखावे साकारले होते.

स्पर्धेचे परीक्षक म्हणून आदर्श मराठी विद्या मंदिरचे मुख्याध्यापक विठ्ठल पाटील, शांतिनिकेतन पब्लिक स्कूलचे शिक्षक महांतेश पाटील आणि सिद्धिविनायक इंग्रजी माध्यम शाळेचे शिक्षक प्रदीप पाटील यांनी जबाबदारी सांभाळली. या प्रसंगी गावातील बालगोपाळ, वयस्कर मंडळी, वारकरी मंडळी आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते