सिंगिनकोप येथे विजेच्या तारेवर झाड कोसळले, नागरिकांचा जीव धोक्यात
खानापूर: तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. नदी नाले ओसंडून वाहत आहेत. मलप्रभा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. तर अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.
अनेक ठिकाणी घरे, झाडे कोसळत आहेत. अशीच एक घटना नुकताच सिंगिनकोप येथे घडली आहे.
गावात असलेल्या मुख्य रस्त्यावरील विद्युत तारेवर झाड कोसळल्याने विद्युत तारेने जमिनीला स्पर्श केला आहे. दैव बल्लतर म्हणून कोणतीही जीवित हानी झालेली नाही.
सध्या अनेक गावात ही समस्या आहे. दर वर्षी पावसाआधी हेस्कॉमने काळजी घेतली नाही तर असे प्रकार घडू शकतात. सध्या खानापूर हेस्कॉम संपर्क यंत्रणा कोलमडली आहे. हेस्कॉम खात्यांच्या अधिकाऱ्यांचा ढिसाळपणा यावरून दिसून येत आहे.
त्यासाठी बरीच वर्षे हेस्कॉमच्या कार्यालयात ठाण मांडून बसलेल्या अधिकाऱ्यांची बदली करावी अशीही मागणी खानापूर तालुक्यातून होत आहे.