खानापूर
घरगुती मखर सजावट स्पर्धेचा बक्षीस समारंभ उद्या
खानापूर: खानापूवार्ता आयोजित व जिजाऊ गणेश उत्सव मंडळ पुरस्कृत घरगुती मखर सजावट स्पर्धेचा बक्षीस समारंभ उद्या (3 सप्टेंबर) सायं. 5 वाजता पार पडणार आहे. काही कारणास्तव हा समारंभ नियोजित तारखेच्या एक दिवस आधी आयोजित करण्यात आला आहे.
सहभागी सर्व गणेश भक्तांन उद्या संध्याकाळी जिजाऊ गणेश उत्सव मंडळ, शिवस्मारक चौक, खानापूर येथे उपस्थित राहावे.

