खानापूर

खानापूर तहसीलदार प्रकाश गायकवाड निलंबित; प्रभारी म्हणून रवींद्र हाडिमनी यांची नियुक्ती

खानापूर: लोकायुक्त धाडीनंतर खानापूरचे तहसीलदार प्रकाश गायकवाड यांच्यावर क्रिमिनल खटला (1/2025) असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सरकारने पुढील आदेश येईपर्यंत त्यांना निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे.

सरकारच्या आदेशानुसार:
जिल्हाधिकाऱ्यांना श्री गायकवाड यांना विद्यमान पदावरून मुक्त करून धारवाड जिल्हाधिकारी कार्यालयातील रिक्त पदावर बदलीसाठी हजर होण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

याचबरोबर, खानापूर तहसीलदार पदाचा कार्यभार पुढील आदेश येईपर्यंत श्री रवींद्र हाडिमनी (ग्रेड-1 तहसीलदार, कित्तूर) यांच्याकडे प्रभारी म्हणून सोपविण्यात आला आहे.

महत्वाचे:
श्री गायकवाड यांना न्यायनिवाडा होईपर्यंत जिल्हा न सोडण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

या निर्णयामुळे प्रशासनात मोठा बदल झाला असून नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे.

Back to top button
अल्लू अर्जुन याला का अटक झाली? महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते