खानापूर : तालुक्यात यावर्षी जोरदार पाऊस पडत आहे. या पावसामुळे तालुक्यात बऱ्याच घरांची पडझड होत आहे. पडझड झालेल्या घरांचे ताबडतोब पंचनामे करून तहसिलदार कार्यालयाकडे पाठवायचे आहेत.
पंचनाम्या मधे कोणत्याही प्रकारचा गोंधळ होऊ नये. पडझड झालेल्या घरांचे पंचनामे व्यवस्थित व्हावेत, पीडीओ व इंजिनियर यांनी लोकांना नाहक त्रास देऊ नये, स्वताच्या पगारातील पैसे द्यायचे असल्यासारखे जनतेशी वागू नये, सरकारचे पैसे आहेत लोकांना मिळू द्यात, गावचे राजकारण यात आणू नये, जो नुकसानग्रस्त आहे मग ते कोणीही असो निस्वार्थपणे पंचनामे व्हावेत यासाठी तहसीलदाराने संबंधित अधिकाऱ्यांना सूचना करावी, अशी विनंती खानापूर तालुका काँग्रेसच्या वतीने करण्यात आली. याबाबत पालकमंत्री यांच्यासोबत देखील चर्चा करणार असल्याने ब्लॉक काँग्रेसने सांगितले.
नुक़सान भरपाई साठी खालीलप्रमाणे तरतूद आहे.
A कॅटॅगरी – ५ लाख त्यासाठी पूर्णता किंवा ७५% पेक्षा जास्त घर पडलेले असले पाहीजे
B कॅटॅगरी – ३ लाख – त्यासाठी अर्धे घर म्हणजेच दोन भिती पडणे आवश्यक आहे
C कॅटॅगरी – ५० हजार – त्यासाठी १ भिंत पत्रे उडणे वगैरे अटी आहेत.

तालुक्यात पुरामुळे अनेक नदी नाल्यावरील रस्ते बंद होताना दिसत आहेत त्याठिकाणच्या परिस्थितीचा आढावा घेत जनतेला पोलीस संरक्षण देण्यात यावे अशी ही मागणी तहसिलदार यांचेकडे करण्यात आली.
यावेळी ब्लॉक अध्यक्ष महादेव कोळी, ॲड ईश्वर घाडी, सुरेश भाऊ, यशवंत बिरजे,दिपक कवठनकर, तोहीद चंदखन्नावर, गुड्डू टेकडी, यशवंत पाटील, राजू कब्बूर, रित्वीक कुंभार
रूद्राप्पा पाटील उपस्थित होते.
