खानापूर

खानापूरच्या श्री कल्लाप्पा तिरवीर यांचे रंन मॅरेथॉन स्पर्धेत सुयश

बेळगांव: रविवार दिनांक 18 ऑगस्ट 2024 रोजी आपटेकर स्पोर्ट्स फाउंडेशन आयोजित बेळगाव रन हाफ मॅरेथॉन स्पर्धेमध्ये श्री कल्लाप्पा तिरवीर तोपिनकट्टी ता. खानापूर यांचा 46 ते 99 वर्ष वयो गटामध्ये द्वितीय क्रमांक पटकावला.

ही स्पर्धा बेळगाव जिल्हा क्रीडांगण या ठिकाणी प्रारंभ झाली यामध्ये दहा किलोमीटर पाच किलो मीटर व तीन किलोमीटर अशा तीन गटांमध्ये 15 ते30 31 ते 45 व 46 ते 99 अशा तीन गटांमध्ये या स्पर्धा झाल्या.

या स्पर्धेमध्ये बेंगलोर म्हैसूर मंगळूर गोवा महाराष्ट्र आर्मी सैनिक स्कूल सह विविध जिल्ह्यांतील व विविध राज्यातील जवळपास एक हजारहून अधिक स्पर्धकांनी यामध्ये भाग घेतला होता सुनील आपटेकर फाउंडेशन यांचा मुख्य हेतू शरीर सुदृढ व्हावे व उत्साह आनंद मिळण्यासाठी व्यायामाचा सराव करावा या उद्देशाने ही स्पर्धा दरवर्षी घेण्यात येते.

श्री कल्लाप्पा तिरवीर हे वयाच्या दहा वर्षापासून आजपर्यंत सातत्याने सराव करत देश विदेश स्पर्धामध्ये अनेकवेळा सुवर्णपदक प्राप्त केले आहे.  आजही नियमित 20 किलोमीटर रनिंग सराव कोल्हापूर येथे करत असतात आज स्वतःचा व्यवसाय सांभाळत अशा सर्व स्पर्धांमध्ये त्यांनी आपले वर्चस्व टिकविले आहे. सातत्याने सराव केल्याने असाध्य गोष्ट साध्य करता येते याचे मार्गदर्शन प्राथमिक शाळा हायस्कूल आणि आज आंतरराष्ट्रीय कोच यांचे मार्गदर्शन व स्थानिकांची प्रेरणा घेऊन तरुणाला लाजवेल असे कार्य त्यांच्याकडून नेहमी घडत असते हा आदर्श आपल्या बेळगाव जिल्ह्याने राज्य व देशाने घ्यावा अशी त्यांचे कार्य होत आहे.
आजही गर्लगुंजीचे श्री एल जी कोलेकर ज्येष्ठ कोच यांचे मार्गदर्शन लाभत आहे यांनी आपला सराव जिद्द व चिकाटी आणि मेहनत याच्या जोरावर सर्वांची मने जिंकली आहे ते मनमिळावू आणि विवेकशील वृत्तीमुळे सर्वांचे चाहते आहेत.

Related Articles

महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते