खानापूर

पावसाचे पाणी गाळून पिण्याची वेळ,  पडलवाडी गावातील व्यथा

पडलवाडी: बिजगर्णी पंचायत हद्दीत येणाऱ्या पडलवाडी गावात पंचायतीच्या वेळकाडू पणामुळे गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्याची समस्या उद्भवत असल्याने गावकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.

गावात सध्या दोन बोअरवेल असून ग्राम पंचायतीने अजून या बोअरवेलला हॅण्ड पंप न बसवल्याने गावातील नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत.

हॅण्ड पंप बसवण्याबाबत मे महिन्यापासून गावकरी पंचायत मेंबर आणि PDO यांना विनंती करत आहेत तरी देखील अजून हे हॅण्ड पंप बसवले नसल्याने सध्या गावकऱ्यांना पावसाचे पाणी आणि बाहेरील गावातील पाणी आणण्याची वेळ आली आहे.

तरी पंचायत मेंबर आणि अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर हे हॅण्ड पंप बसवून गावकऱ्यांची पाण्याची समस्या सोडवावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.


Related Articles

महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते