खानापूर

खानापूर जंगलात डुकरांच्या शिकारीसाठी बॉम्ब ठेवल्याप्रकरणी दोघांना अटक

खानापूर, नागरगाळी : खानापूर तालुक्यातील नागरगाळी वन विभागातील सुवातवाडी परिसरात डुकरांची शिकार करण्यासाठी जंगलात बॉम्ब ठेवल्याची माहिती मिळाल्यानंतर, वन विभागाच्या शोध पथकाने दोन आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणात आरोपींना न्यायालयासमोर हजर करून, त्यांना हींडलगा कारागृहात पाठविण्यात आले आहे, अशी माहिती वन विभागाच्या शोध पथकाच्या मुख्य अधिकारी कविता यांनी दिली.

वन विभागाच्या सूत्रांनुसार, नागरगाळीतील सुवातवाडी जंगलात डुकरांची शिकार करण्यासाठी बॉम्ब ठेवण्यात आल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार, मुख्य अधिकारी कविता यांच्या नेतृत्वाखाली वन कर्मचाऱ्यांच्या पथकाने शोधमोहीम राबवून, संशयित अमोल पी. (वय 19, रा. शिमोगा, हक्की विकी जमात) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 67 बॉम्ब जप्त करण्यात आले असून त्याच्या चौकशीतून या प्रकरणात अनिल मारुती पाटील (सुवातवाडी) याचा सहभाग असल्याचे उघड झाले आहे.

दोन्ही आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास वन विभागाच्या शोध पथकाच्या अधिकारी कविता यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

विशेष म्हणजे, शिमोगा येथील काही जमातीचे लोक खानापूर परिसरात डुकरांची शिकार करण्यासाठी बॉम्बचा वापर करतात, अशी वन विभागाला माहिती आहे. यापूर्वीही अशाच प्रकारच्या घटनांमध्ये शिमोगा येथील काही जणांना अटक करून मोठ्या प्रमाणात बॉम्ब जप्त करण्यात आले होते. माचीगड रस्त्यावर दुचाकीवरून जाताना झालेल्या बॉम्ब स्फोटात एक जण मृत्यूमुखी पडला होता. त्यामुळे, अशा घटना थांबविण्यासाठी वन विभागाने सखोल तपास हाती घेतला आहे.

Related Articles

महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते