खानापूर

खानापूर: श्री नरसिंह भटजी गुरुजी यांचे आज दुपारी दुःखद निधन

खानापूर: खानापूर हिंदू नगर येथील रहिवासी व मुळचे यल्लापुर तालुक्यातील असलेले तालुक्यातील हलसी येथील श्री नरसिंह मंदिराचे पुजारी वं सध्या खानापूर हिंदू नगर येथील रहिवासी भटजी नरसिंह भट (वय 60) यांचे गुरुवारी दुपारी अल्पशा आजारान निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, विवाहित मुलगी असा परिवार आहे. म्हणून अनेक वर्षे सवा बजावून ते खानापूर येथे काही वर्षापासून स्थायिक होते. गेल्या दोन महिन्यापासून ते अल्पशा आजाराने त्रस्त होते.

नरसिंग भटजी हे खानापुरात उत्कृष्ट भटजी म्हणून प्रसिद्ध होते. खानापूर तालुक्यातील वास्तुशांती, गण होम आणि लक्ष्मी देवी यात्रा उत्सवापूर्वी देवी देवतांचा विवाह सोहळा, धार्मिक विधी मुंजिवंदन या कार्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. तालुक्यातील निम्म्याहून अधिक मंदिरांच्या धार्मिक विधींमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे अनेक ठिकाणी त्यांनी भटजी कामात कौशल्य दाखवून अनेकांना प्रभावित केले होते. त्यामुळे ते नामवंत भटजींच्या पदावर होते. त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी 6 वाजता खानापूर येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
digital fast: डिजिटल उपवास: फायदे आणि तोटे कामाचा ‘6-6-6’ नियम: कमी वेळेत जास्त यश! सोन्याच्या दरात आणखी घसरण! आजचे ताजे भाव जाणून घ्या डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? फसवणूक कशी होते? काय करावे digital arres अल्लू अर्जुन याला का अटक झाली?