खानापूर

रुमेवाडी क्रॉस-करंबळ मार्गावरील खड्डे दुरुस्त करा अन्यथा टाळे ठोकू

खानापूर: शहरातील रुमेवाडी क्रॉस ते करंबळ मार्गावर खड्ड्यांमुळे धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसामुळे खड्ड्यांत पाणी साचले असून, वाहन चालकांसाठी ही परिस्थिती अत्यंत त्रासदायक बनली आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी खड्ड्यांमुळे अपघातांची शक्यता वाढत आहे, ज्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे.

खड्ड्यांच्या या समस्येवर तातडीने तोडगा न काढल्यास, चार दिवसांच्या आत सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा खानापूर ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष अ‍ॅड. ईश्वर घाडी यांनी दिला आहे. गणेशोत्सवाच्या काळात तात्पुरत्या मलमपट्टीमुळे खड्ड्यांची समस्या थोड्या काळासाठी दूर झाली होती, परंतु परतीच्या पावसाने ती पुन्हा वाढली आहे.

सणासुदीच्या काळात, विशेषतः दिवाळीत, परराज्यातील नागरिक याच मार्गाने आपल्या गावी परतणार आहेत. खड्ड्यांनी भरलेल्या रस्त्यावरून प्रवास करताना त्यांना मोठ्या अपघातांचा सामना करावा लागू शकतो. घाडी यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अभियंत्यांना तातडीने खड्डे दुरुस्त करण्याचे आवाहन केले आहे, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

Back to top button
error: Content is protected !!
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा! ashadhi ekadashi quotes in marathi: Ashadhi ekadashi 2025: आषाढी एकादशीचे महत्त्व digital fast: डिजिटल उपवास: फायदे आणि तोटे कामाचा ‘6-6-6’ नियम: कमी वेळेत जास्त यश! सोन्याच्या दरात आणखी घसरण! आजचे ताजे भाव जाणून घ्या