आमदार विठ्ठलराव हलगेकर: ग्रामीण भागातील रस्त्यांचा होणार कायापालट
खानापूर: विधानसभा मतदारसंघात ‘प्रगतीपथ’ योजनेंतर्गत 37.62 कि.मी. लांबीचे एकूण 30 ग्रामीण रस्ते विकसित करण्याचे नियोजन आहे. आमदार विठ्ठल हलगेकर यांनी ग्रामविकास व पंचायत राज विभागामार्फत एक विशेष कृती आराखडा तयार करून सरकारला सादर केला आहे. यापैकी 23 रस्त्यांच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे, अशी माहिती आमदार हलगेकर यांनी रविवारी (दि. 6) पत्रकार परिषदेत दिली.
मंजूर करण्यात आलेले रस्ते पुढीलप्रमाणे:
- गुंडेनहट्टी – भुरणकी क्रॉस
- रामगुरवाडी – राज्य महामार्ग संपर्क रस्ता
- गणेबैल – काटगाळी रोड
- काटगाळी – राष्ट्रीय महामार्ग संपर्क रस्ता
- इदलहौंड – खेमेवाडी रोड
- गुंजी – गुंजी रेल्वे स्थानक
- गंदिगवाड – बिदरनट्टी
- किरावळे – राष्ट्रीय महामार्ग संपर्क रस्ता
- असोगा – हरसणवाडी – कांजळे
- मुघवडे – कबनाळी
- कणकुंबी – चिगुळे
- बिळकी – बंकी
- लिंगणमठ – चुंचवाड
- चिक्क आंग्रोळी – हंदूर
- यडोगा – चापगाव
- कुन्हाडवाडा – लोहारवाडा – राष्ट्रीय महामार्ग संपर्क रस्ता
- भालके – राष्ट्रीय महामार्ग संपर्क रस्ता
- माण – राज्य महामार्ग संपर्क रस्ता
- कणकुंबी – तळावडे
- अक्राळी – राष्ट्रीय महामार्ग संपर्क रस्ता
- गष्टोळी – चणकेवैल – सोनेनट्टी – मास्केनहट्टी
- चुंचवाड – करीकट्टी – कक्केरी
- गुंडोळी नवीन लिंगणमठ – चिखले
पूर्वीच्या प्रस्तावात समाविष्ट, परंतु काही सुधारणा करून पुन्हा सादर करण्यात आलेले रस्ते:
- पारवाड – सडा – राज्य महामार्ग संपर्क रस्ता
- कक्केरी – प्रज्ञा आश्रम मठ
- मंगेनकोप्प – गष्टोली
- पारवाड – कणकुंबी
या सर्व कामांना लवकरच सुरुवात केली जाईल, असे आमदार हलगेकर यांनी सांगितले. यावेळी भाजप तालुका अध्यक्ष बसवराज सानिकोप, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, सुंदर कुलकर्णी, संजय कुबल, सदानंद पाटील, मल्लाप्पा मारिहाळ, आप्पय्या कोडोळी आदी उपस्थित होते.
जंगल भागातील रस्त्यांची कामेही व्हावीत
खानापूर तालुक्याच्या दुर्गम भागांतील अनेक गावांना आजही चांगल्या रस्त्यांचा अभाव आहे. पावसाळ्यात या गावांचा संपर्क तुटतो. वनविभागाच्या परवानगीअभावी जंगलमय भागातील रस्त्यांची कामे रखडली आहेत. त्यामुळे तांत्रिक अडचणी दूर करून या रस्त्यांचाही विकास करावा, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे.