खानापूर: मंगळवार पासून श्री मऱ्याम्मा देवीची यात्रा
खानापूर: शहराच्या सीमेवरील जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या मऱ्याम्मा देवीचा वार्षिकोस्तव यात्रा मंगळवार दि 11 व 12 जून रोजी मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे हा वार्षिकोत्सव प्रतिवर्षी मृगनक्षत्रानंतर येणाऱ्या पहिल्या मंगळवारी साजरा केला जातो या वर्षी मंगळवार दिनांक 11 जून रोजी सकाळी 8 वाजता मऱ्याम्मा देवीचा अभिषेक करून या वार्षिकोस्तवाला सुरवात होणार आहे.
अभिषेक कार्यक्रम होताच समस्त गावकऱ्यांच्या वतीने मऱ्याम्मा देवीला नैवेद्य व ओट्या अर्पण केल्या जाणार आहेत तसेच बुधवार दि 12 जून रोजी सकाळी 10.30 वाजल्यापासून ओटी नैवेद्या बरोबरच नवस फेडण्याचा कार्यक्रमाला ही सुरवात होणार आहे नवस फेडण्याचा कार्यक्रम हा रात्री उशिरापर्यंत चालणार आहे.
तरी या वार्षिकोस्तव कार्यक्रमामध्ये सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा अशी मऱ्याम्मा देवी उसत्व कमिटीच्या वतीने विनंती करण्यात आली आहे मऱ्याम्मा मंदिराची उभारणी झाल्यापासून भक्तांची प्रस्त वाढलेली असून खानापूरच न्हवे तर शेजारच्या बेळगाव गोवा या भागातून ही भाविक या वार्षिकोस्तवाला मोठ्या संख्येने येत आहेत !! तरी सर्वांनी यात्रेला उपस्थित राहून मंडळाला सहकार्य करावे असे आवाहन कमिटी व ग्रामस्थांनी केले आहे.
व्हिडीओ पहा: