खानापूर

डेंग्यू निर्मूलन फवारनी करावी: युवा कार्यकर्ते व नागरिकाकडून मागणी

माडीगुंजी: जिल्यात तसेच राज्यात डेंग्यूचे रूग्ण दिवसेंदिवस वाढत असल्याने गावोगावी लासिकरण तसेच विविध उपाययोजना केल्या जात आहेत.  याची काळजी गुंजी येथील नागरिकानी घेण्याचे ठरवले आहे.

सध्या गुंजी गावात व परिसरामध्ये माश्या आणी डासांचे प्रमाण खूप वाढले आहे. याचा त्रास संपूर्ण गावामध्ये व परिसरामध्ये होत असल्याने डेंगू व मलेरिया सारखे आजार पसरण्याची शक्यता वाढत आहे. माश्या व डास यामुळे गावातील नागरिक त्रस्त असून लहान मुलांमध्ये व वयोवृद्ध लोकांमध्ये काही आजार बळकावत आहेत. हिच बाब लक्षात घेऊन गुंजीतील युवा कार्यकर्ते पंकज कुट्रे व संदीप घाडी यांच्या मार्गदर्शनातून गुंजीतील युवा कार्यकर्ते व नागरिकांच्या कडून “माश्या व डास निर्मूलन औषध” फवारनी त्वरित करावी अशी मागणी करत गुंजी ग्रामपंचायतच्या PDO पत्तार मॅडम व कार्यदर्शी बाळू सनदी यांच्याकडे निवेदन देण्यात आले.

या निवेदनात, नागरिकांचे आरोग्य धोक्यात पडण्याची शक्यता आहे त्यासाठी ग्रामपंचायतीने याच्यावर वेळीच लक्ष देऊन आवश्यक अशी औषध फवारांनी करावी अशी मागणी केली जात आहे.  यावेळी निवेदन देताना गुंजीचे युवा कार्यकर्ते कार्तिक कुंभार, संदेश पाटील, सुनील चव्हाण, उस्मान मुल्ला व गावातील इतर नागरिक उपस्थित होते.

madigunji khanapur taluka

dengue

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते