खानापूर
खानापूर तालुक्यातील काटगाळी गावाला नवीन बससेवेचा शुभारंभ, ग्रामस्थांचा जल्लोष
बेळगावहून देसूर मार्गे काटगाळीपर्यंत ही नवी बस सेवा सुरू करण्यात आली आहे. या निर्णयामुळे काटगाळी व परिसरातील ग्रामस्थांना प्रवासाची सोय उपलब्ध झाली असून, सर्वत्र समाधान व्यक्त केले जात आहे.

या कार्यक्रमात कर्नाटक दलित संघर्ष समिती (अंबेडकरवाद) यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी पूजन विधी पार पडला. या वेळी समितीचे जिल्हाध्यक्ष मंतेश तळवार, राज्य खजिनदार सिद्धप्पा कांबळे, तालुका अध्यक्ष कृष्णराजू कोळकर, तसेच संतोष कांबळे, बिजगर्णी राजकरणवर, लक्ष्मण कांबळे, नागेश कामशेट्टी, रामण्णा चौहान, दीपक दबाडे, कल्लप्पा नायक, आकाश कांबळे, मनोहर अज्जणकत्ती, आर. जे. कांबळे, राजशेखर आदी मान्यवर उपस्थित होते.