खानापूर

खानापूर येथे जिल्हास्तरीय रोजगार मेळावा: नोकरीची सुवर्णसंधी

खानापूर: रावसाहेब वागळे पदवीपूर्व महाविद्यालय आणि करावळी टीचर्स हेल्पलाईन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात विविध नामांकित कंपन्यांमध्ये थेट मुलाखतींद्वारे नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. SSLC, PUC, NTC, D.Ed, B.Ed, BPEd, BA, B.Com, B.Sc, MA, M.Com, M.Sc, BSW, MSW, MBA, BBA, BCA, PG, ITI अशा विविध शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार सहभागी होऊ शकतात. शाळा, महाविद्यालये, बँकिंग क्षेत्र आणि एमएनसी कंपन्यांमध्ये थेट भरतीची संधी उपलब्ध आहे.

मुलाखतीसाठी येणाऱ्या उमेदवारांनी रिझ्युमे, एसएसएलसी, पीयूसी, डिग्रीचे मार्क्स कार्ड, आधार कार्ड आणि पॅन कार्ड या मूळ कागदपत्रांसह उपस्थित राहणे आवश्यक आहे. हा मेळावा 8 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत रावसाहेब वागळे पदवीपूर्व महाविद्यालय परिसर, खानापूर येथे आयोजित करण्यात आला आहे. करावळी टीचर्स हेल्पलाईन, जॉब जंक्शन MNC कन्सल्टन्सी आणि आयसीआयसीआय बँक,ॲक्सिस बँक  या प्रमुख कंपन्यांचा सहभाग असणार आहे. नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही महत्त्वाची संधी असून, थेट मुलाखतीसाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी 9743218480, 8762903585 आणि 9483445835 या क्रमांकांवर संपर्क साधावा.

whatsapp
whatsapp
Back to top button
error: Content is protected !!
digital fast: डिजिटल उपवास: फायदे आणि तोटे कामाचा ‘6-6-6’ नियम: कमी वेळेत जास्त यश! सोन्याच्या दरात आणखी घसरण! आजचे ताजे भाव जाणून घ्या डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? फसवणूक कशी होते? काय करावे digital arres अल्लू अर्जुन याला का अटक झाली?